सलमान खान व भाग्यश्रीचा ‘मैने प्यार किया’ आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. हा चित्रपट न पाहिलेला प्रेक्षकवर्ग क्वचितच असेल. सलमान-भाग्यश्रीची या चित्रपटामधील केमिस्ट्री तर प्रचंड गाजली. आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीने पाहतात. १९८९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर धुमाकूळ घातला होता. याच चित्रपटामधील एक किस्सा प्रचंड गाजला होता. या चित्रपटादरम्यानच सलमानला फोटोग्राफरने भाग्यश्रीला किस करण्यास सांगितलं होतं.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan
जेव्हा सलमान खानने जवळून पाहिलेला मृत्यू; म्हणाला, “४५ मिनिटं विमानाच्या इंजिनाचा…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
udit narayan again lip kissed female fan video viral
Video: काय चाललंय? उदित नारायण यांनी पुन्हा चाहतीच्या ओठांचं घेतलं चुंबन; नेटकरी म्हणाले, ‘सीरियल KISSER’
Salman Khan And Shahrukh Khan
राकेश रोशन गाढ झोपेत असताना सलमान-शाहरूख खान त्यांच्या खोलीबाहेर गोळीबार…; दिग्दर्शक म्हणाले, “त्यांची सीमारेषा…”
Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर

ऑनस्क्रीन सलमान कोणत्याच सह-अभिनेत्रीला किस करत नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. ‘मैने प्यार किया’ चित्रपटादरम्यान सलमानने भाग्यश्रीला किस करतानाचा फोटो फोटोग्राफरला हवा होता. या फोटोग्राफरने जेव्हा तिला किस कर असं सलमानला सांगितलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती हे एका मुलाखतीदरम्यान भाग्यश्रीने सांगितलं होतं.

‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने सांगितलं की, “त्यावेळी आम्ही अगदी नवोदित कलाकार होतो. त्यादरम्यान सलमानला फोटोग्राफरने सांगितलं की मी जेव्हा कॅमेरा सेट करेन तेव्हा तू भाग्यश्रीला किस कर. पण फोटोग्राफरचं बोलणं झाल्यानंतर सलमान जे उत्तर दिलं तेच मला अपेक्षित होतं.”

आणखी वाचा – Video : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं नाव काय ठेवणार? नीतू कपूर म्हणाल्या…

“सलमानने त्या फोटोग्राफरला उत्तर दिलं की, या फोटोआधी तुला भाग्यश्रीची परवानगी घ्यावी लागेल. तिच्या परवानगीशिवाय तुम्हाला एकही फोटो मिळणार नाही. सलमानच्या या उत्तरानंतर मला याची जाणीव झाली की, मी ज्या लोकांबरोबर काम करत आहे तिथे मी सुरक्षित आहे.” किसिंग फोटो किंवा किसिंग सीनला तेव्हा फार प्रसिद्धी नव्हती असंही भाग्यश्री यावेळी म्हणाली.

Story img Loader