‘७२ हूरें’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पहिला टीझर रिलीज झाल्यापासूनच ‘७२ हूरें’ चित्रपट वादात सापडला आहे. अनेकांनी चित्रपटाच्या नावावरूनही आक्षेप नोंदवला आहे. अशातच आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू कॅम्पसमध्ये ‘७२ हूरें’च्या स्पेशल स्क्रीनिंगची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’मधील वादग्रस्त शब्दांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, निर्मात्यांनी चित्रपटात केले ‘हे’ बदल

‘७२ हूरें’ चित्रपटाची कथा दहशतवाद, ७२ कुमारिका मुलींचे खोटे आश्वासन देऊन तरुणांचे ब्रेनवॉश कशाप्रकारे केले जाते यावर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे या चित्रपटातील बहुतांश दृश्यांवर काही राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. चित्रपटात मांडलेल्या अशा नकारात्मक गोष्टींमुळे विशिष्ट धर्माबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि सामाजिक जडणघडणीवर याचा विपरित परिणाम होईल, असे या राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. तसेच मौलाना साजिद रशीद यांनी ‘७२ हूरें’ चित्रपटावर आक्षेप नोंदवत धार्मिक शिकवण चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : छोट्या पडद्यावर उलगडणार सिंधुताईं सपकाळ यांचा जीवनपट; किरण माने दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, म्हणाले…

चित्रपटावरून एवढा वाद सुरु असतानाच निर्मात्यांनी ४ जुलै रोजी जेएनयूमध्ये ‘७२ हूरें’ चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. “जेएनयूमधील या स्पेशल स्क्रीनिंगमुळे विद्यार्थ्यांना चित्रपटात चित्रित केलेल्या दहशतवादी घटनांच्या वास्तववादी सत्यावर व्यक्त होण्याची संधी मिळेल. दहशतवादासारख्या गंभीर विषयावर विद्यार्थ्यांना मोकळेपणाने संवाद साधता येईल.” या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : “ओंक्या तू गद्दार आहेस”, ओंकार भोजनेच्या नाराज चाहत्याला दिले नम्रता संभेरावने उत्तर; म्हणाली, “त्याच्या…”

दरम्यान, ‘७२ हूरें’ हा चित्रपट ७ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक जय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. चित्रपटात पवन मल्होत्रा, आमिर बशिर, राशिद नाज, अशोक पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makers of 72 hoorain to hold a special screening at jnu on 4th july sva 00
Show comments