अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला मिशन रानीगंज हा चित्रपट आठ दिवसांपूर्वी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. सरदार जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे खाणीत अडकलेल्या ६५ कामगारांना वाचवण्यासाठी सरदार जसवंत सिंग गिल यांनी व इतरांनी केलेल्या मदतीची कहाणी हा सिनेमा सांगतो. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. पण त्याला चांगले रिव्ह्यू मिळाले. आता निर्मात्यांनी हा चित्रपट ऑस्करमध्ये पाठविला आहे.
“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”
चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता स्वतंत्रपणे चित्रपट ऑस्कर अकादमीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच हा चित्रपट सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कारासाठी पात्र नसला तरी, तो मागच्या वर्षीच्या ‘आरआरआर’प्रमाणेच इतर प्रत्येक प्रमुख कॅटेगरीमध्ये स्पर्धा करण्यास पात्र असेल. ऑस्करमध्ये ‘मिशन रानीगंज’ कोणत्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा करणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोणताही देश इंग्रजी नसलेले चित्रपट ऑस्करसाठी दोन प्रकारे पाठवू शकतो. एक म्हणजे अकादमीने नियुक्त केलेल्या संस्थेने निवडलेली देशाची अधिकृत एन्ट्री. भारतात फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे सिनेमाची निवड होते. दुसरा प्रकार म्हणजे स्वतंत्र एन्ट्री होय. स्वतंत्र चित्रपट पाठवायचा असेल तर त्यासाठी अमेरिकेत थिएटर रिलीजसंदर्भातील काही अटी पूर्ण कराव्या लागतात. गेल्या वर्षी गुजराती चित्रपट ‘छेल्लो शोला’ भारताने अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवलं होतं. तर, राजामौलींचा तेलुगू सिनेमा ‘आरआरआर’ हा स्वतंत्र एन्ट्री होता.
यंदा भारताने ‘2018: एव्हरीवन इज अ हिरो’ या मल्याळम चित्रपटाला भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून ऑस्करसाठी निवड केली आहे. अशातच आता अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ स्वतंत्र एन्ट्री म्हणून ऑस्करमध्ये गेला आहे.