सेलिब्रिटी सिस्टर्स अमृता अरोरा आणि मलायका अरोरा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. अशातच त्यांनी त्यांच्यातील वाढते मतभेद बाजूला सारून आणि गोव्यात चांगला वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. पण तिथेही दोघींमध्ये पुन्हा वाद झाला. मलायकाने एका रेस्टॉरंटमध्ये तिचा फोन हरवला. त्यानंतर या दोन्ही बहिणींमध्ये वाद झाला. फोन हरवल्यानंतर मलायका चिडली आणि रेस्टॉरंटमधील लोकांसमोर ती अमृतावर ओरडली. अमृतानेच गंमत करण्यासाठी फोन लपवल्याचा आरोप मलायकाने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मलायकाने कपडे आणि करिअरबद्दल केलेल्या विनोदांवरून बहीण अमृता नाराज; म्हणाली, “तू माझ्याबद्दल…”

मलायका रेस्टॉरंटमधील लोकांवर चांगलीच संतापली होती. एकाने फोनचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला. त्यावर “तुला माझ्या फोनचा रंग कसा माहीत? तू घेतलास की काय?” असं ती म्हणाली. त्यानंतर अमृता बहिणीचा हरवलेला फोन शोधू लागली. “तुझं हे नेहमीचंच आहे,” असंही अमृता म्हणाली, तेव्हा मलायका म्हणाली, “तू काही केलंस का? तू मस्करी करतेय का?” या आरोपांमुळे अमृता आणखी चिडली. तेवढ्यात बारटेंडरला ते बसलेल्या टेबलावर फोन सापडला आणि वाद वाढला. “तू टेबलावर पाहिलं नाहीस का?” असं मलायकाने विचारताच अमृता म्हणाली, “मी पाहिलं होतं.” एवढं झाल्यानंतरही मलायकाचा राग शांत झाला नाही आणि सतत अमृताला बोलत होती. नंतर अमृताही मलायकावर चिडली आणि “तूझं नेहमीचंच आहे, काही झालं की माझ्यावर सगळं टाकतेस. काय झालं ते संपूर्ण रेस्टॉरंटनं पाहिले. ती तुझी चूक होती.” नंतर अमृताने मलाइकाला एकटीला परत पाठवलं आणि मला तुझ्या बरोबर राहायचं नाही, असं ती म्हणाली.

मलायकाने आपल्याला सर्वांचा मूड खराब करायचा नव्हता, असं म्हटलं. थोड्या वेळाने दोघींचा राग शांत झाला आणि त्या परत एकत्र आल्या. मग अमृताने मलायकाला तिच्या न्यूयॉर्क प्लॅनबद्दल विचारलं. तसेच “अर्जुनचं काय चाललंय, तो काय करतोय?” त्यावर मलायका म्हणाली, “आम्ही काहीतरी विचार केलाय, पाहू काय होतंय ते. सध्या बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. तसेच मी मागच्या काळात खूप तणावाखाली होते, ते तुम्ही पाहिलंय,” असं मलायकाने सांगितलं.

…अन् मलायका अरोरा बहीण अमृतावर संतापली; रागात म्हणाली, “मला सर्वात जास्त त्रास…”

दरम्यान, पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये या दोघी बहिणींमध्ये आणखी भांडण झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच बीचवर रडत बसलेली मलायका समुद्रकिनाऱ्यावर अमृताला म्हणाली, “जेव्हा मी माझ्या आयुष्यात सर्वात कठीण टप्प्यातून गेले, तेव्हा मला माझी बहीण म्हणून तुझी सर्वात जास्त गरज होती. तू तिथे नव्हतीस. तू एक चांगली आई, पत्नी आणि मैत्रीण आहेस, पण तू एक चांगली बहीण कधी होणार?” असं ती अमृताला म्हणते.