अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान काही वर्षांपूर्वीच एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळे झाले. मात्र चाहत्यांना आजही या दोघांना एकत्र पाहण्याची उत्सुकता असते. या दोघांच्या घटस्फोटांनंतर चाहत्यांची बरीच निराशा झाली होती. मात्र आता त्यांचा मुलगा अरहानसाठी मलायका आणि अरबाज पुन्हा एकत्र आले आहेत. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात अरबाज मलायका एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोट घेतला असला तरीही अरहानच्या पालकत्वाच्या बाबतीत मात्र दोघंही खूप जागरुक आहे. दोघंही आपलं पालकत्व नेहमीच चांगल्या पद्धतीने निभावताना दिसतात. अरहान परदेशात फिल्म मेकिंगचा अभ्यास करत असल्याने अनेकदा हे दोघंही त्याला एअरपोर्टवर एकत्र सोडण्यासाठी किंवा घरी आणण्यासाठी गेलेले दिसतात. असंच आताही अरबाज मलायका आणि अरहान एअरपोर्टवर एकत्र दिसले.
आणखी वाचा- “मलायकाला डेट करू लागल्यापासून रोज रात्री…,” अर्जुन कपूरने उघड केलं त्यांच्या रिलेशनशिपचं गुपित
मुलगा अरहानला एअरपोर्टवर सोडताना मलायका खूपच इमोशनल झालेली दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती वारंवार अरहानला मिठी मारताना दिसत आहे. त्यानंतर मलायका पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानला मिठी मारताना दिसते आणि नंतर दोघंही आपापल्या गाड्यांमध्ये बसून निघून जातात. या व्हिडीओचं नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.
आणखी वाचा- “तिच्या कपड्यांचे…” घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराच्या कपड्यांबाबत अरबाज खानने केलेलं वक्तव्य
दरम्यान नेटकरी दोघांच्या सह-पालकत्वाचं कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं, “सुशिक्षित लोकच असे असतात. मन जिंकलं.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “आजही दोघेही एकमेकांचा मनापासून आदर करतात. किती सुंदर गोष्ट आहे.” तर आणखी एका युजरने, “कृपया तुम्ही दोघं पुन्हा एकत्र या.” अशी कमेंट केली आहे. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रीयानीला डेट करत असल्याचं बोललं जातं.