मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे जीम लूक्स, तिचा नवीन टॉक शो, आयटम नंबर या तिच्या कामाव्यतिरिक्त मलायका तिचं अर्जुन कपूरबरोबरचं नातं आणि तिचा आधीचा पती अरबाज खानपासून घेतलेल्या घटस्फोटामुळे बरीच चर्चेत असते. याबरोबरच मलायकाच्या फॅशनचीही जबरदस्त चर्चा होते. तिचे हॉट लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडतात. या वयातही तिने स्वतःला कमालीचं फिट ठेवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच मलायकाने मुंबईतील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये मलायकाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये मलायका चांगलीच हॉट दिसत होती. तिने परिधान केलेले कपडे हे अगदी बोल्ड नसले तरी या आऊटफिटमध्ये ती खूप ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती. नेमकी मलायका जेव्हा मीडियासमोर फोटो काढायला आली तेव्हा मात्र तिची चांगलीच फजिती झाली.

आणखी वाचा : ‘पठाण’च्या दिग्दर्शकाबरोबरचा प्रभासचा आगामी चित्रपट झाला डबाबंद; परत करावे लागले ‘एवढे’ कोटी

या आऊटफिटमध्ये मलायकाच्या पोटाकडचा भाग उघडाच असल्याने तिच्या कमरेवर आणि नाभीवर बऱ्याच लोकांचं लक्ष गेलं. फोटोग्राफर्ससमोर फोटो काढताना मलायकाच्या ही गोष्ट लक्षात आली अन् लगेचच तिने हातातील पर्सने आपल्या पोटाचा भाग झाकला. त्यानंतर संपूर्ण इव्हेंटदरम्यान मलायका असाच पर्सच्या साहाय्याने तो भाग लपवत फिरत होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्या नाभीवर टिप्पणी करत तिला ट्रोल केलं आहे. तिच्या पोटावर पडलेल्या सुरकुत्या पाहून नेटकऱ्यांनी, ‘बुढी घोडी लाल लगाम’ अशी कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. काही लोकांनी मलायकाच्या लूकचं कौतुक केलं आहे, तर काहींनी हा आऊटफिट मलायकाला सूट होत नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर काही लोकांनी, ‘अर्जुनची आई वाटत आहेस,’ अशा कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर मलायकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora exposing outfit in event netizens started trolling avn
Show comments