फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. मलायका अरोरा ही उत्तम मॉडेल, आणि डान्सरदेखील आहे. याबरोबरच योगामध्येही ती निपुण आहे. आपल्या फिटनेससाठी आणि खासकरून जीमलुक्ससाठी मलायका प्रचंड चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तिचा चाहता तिच्याबरोबर फोटो काढायला आला अन् त्याने चक्क तिच्या कंबरेवर हात ठेवल्याने कित्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मलायकाबरोबर फोटोसाठी पोज देणाऱ्या चाहत्याची ही कृती पाहून सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे. या चाहत्याला मलायकाच्या कमरेवर हात ठेवताना पाहिल्यावर तर तिथल्या एका बॉडीगार्डची प्रतिक्रिया तर फारच भन्नाट होती.

आणखी वाचा : “आम्ही एकमेकांसाठी…” ‘अ‍ॅनिमल’बद्दल बोलताना बॉबीने केलं देओल कुटुंबाबद्दल मोठं वक्तव्य

मलायका अरोरा सध्या ‘झलक दीखला जा ११’ मध्ये परीक्षक म्हणून काम बघत आहे. याच शोच्या सेटदरम्यान मलायकाला भेटण्यासाठी बरेच चाहते सेटवर गर्दी करतात. नुकत्याच नव्या एपिसोडच्या शूटिंगदरम्यान मलायका लाल रंगाची ग्लॅमरस वेस्टर्न साडी परिधान करून सेटवर आली तेव्हा बऱ्याच चाहत्यांनी तिच्याबरोबर फोटो काढण्याची विनंती केली. यादरम्यान मलायकाचा एक चाहता तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी पुढे आला. तो दिव्यांग असल्याने थोडा अडखळत मलायकाजवळ आला, तिनेही त्याला हात पुढे करत बाजूला उभं केलं अन् त्या चाहत्याने फोटो काढताना मलायकाच्या कंबरेवर हात ठेवला.

मलायकाने मात्र यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, त्याला अत्यंत प्रेमाने वागणूक देत त्याच्याबरोबर तिने फोटो काढल्या. यादरम्यान मात्र मलायकाच्या एका बॉडीगार्डने मागे येऊन त्या चाहत्याचा कंबरेवरचा हात खाली हळूच खाली घेतल्याचंही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या चाहत्याला मलायकाच्या एवढ्या जवळ आलेलं पाहिल्यावर तिथे उपस्थित असलेले बाऊंसर्सदेखील आ वासून उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून बऱ्याच लोकांनी मलायकाच्या स्वभावाचे कौतुक केले आहे तर काहींनी त्या चाहत्याला अन् बाऊन्सर्सना ट्रोल केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora fan poses with her for a photograph touches her inappropriately avn