बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीवरून उडी मारून त्यांनी जीवन संपवलं आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोराच्या वडिलांनी छतावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनिल अरोरा यांनी आज (११ सप्टेंबरला) सकाळी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथील सात मजली इमारतीच्या छतावरून अनिल अरोरा यांनी सकाळी ९ वाजता उडी घेतल्याचे वृत्त आहे. अनिल अरोरा यांच्या निधनाबद्दल कळताच मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान त्यांच्या घरी पोहोचला आहे. अरबाज तिथे पोहोचल्याचा व्हिडीओ आयएएनएसने शेअर केला आहे.

मलायका अरोरा पुण्यात होती, वडिलांच्या निधनाची बातमी कळताच ती मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

Story img Loader