Malaika Arora father post mortem report: मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल कुलदीप मेहता यांनी बुधवारी (१२ सप्टेंबरला) आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे भागातील ज्या घरात राहायचे त्याच घराच्या बाल्कनीतून उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचे निधन कशामुळे झाले? याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल मेहता यांच्या मृत्यूचे कारण?

Anil Mehta Death Reason: बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री ८ वाजता विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात अनिल मेहता यांचे शवविच्छेदन करण्यात आले. अनेक जखमांमुळे अनिल यांचा मृत्यू झाला, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिले आहे. अनिल मेहता हे सहाव्या मजल्यावरून खाली पडले होते, त्यामुळे जखमा झाल्या होत्या. त्यांचे निधन जखमांमुळे झाले आहे.

हेही वाचा“मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर

मलायका अरोराच्या आईने जबाबात काय म्हटलं?

अनिल मेहता यांनी (६५) यांचा बुधवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा मेहता यांची पत्नी जॉयसी पॉलीकार्प या घरातच होत्या. सकाळी ९ वाजता त्यांना घरात पतीच्या चपला दिसल्या, पण ते तिथे नव्हते त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. त्या गॅलरीत गेल्या तेव्हा त्यांना सुरक्षारक्षक मदतीसाठी ओरडताना दिसला. नंतर त्यांना जाणीव झाली की काहीतरी भयंकर घडलंय, असं जॉयसी यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितलं.

हेही वाचा – चौकीदार मदतीसाठी ओरडत होता अन्…; मलायकाच्या आईने सांगितलं सकाळी काय घडलं? घटस्फोटानंतरही एकत्र राहायचे अनिल -जॉयसी

मलायका अरोराची भावनिक पोस्ट

वडिलांच्या आत्महत्येनंतर तिने बुधवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. “आमचे प्रिय बाबा, अनिल मेहता यांचे निधन झाल्याची माहिती देताना खूप दु:ख होत आहे. ते खूप चांगले आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे सर्वात चांगले मित्र होते. त्यांच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांना गोपनीयतेची विनंती करतो,” असं मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora father anil mehta post mortem report reveals death reason hrc