अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या तिच्या ‘मुविंग विथ मलायका’ या नव्या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या नव्या शोमधून मलायकाने तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. याबरोबरच मध्यंतरी मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा यांचे संबंध बिघडल्याचंसुद्धा तिने स्पष्ट केलं. याच शोच्या नव्या भागात मलायका अमृताची समजूत काढण्यासाठी गोव्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळेल.
शिवाय यादरम्यान या दोघींमधल्या नात्याबद्दल आणखी माहिती प्रेक्षकांना मिळाली. या भेटीदरम्यान दोघींमध्ये त्यांची आई जॉयस अरोरा यांच्या बांगड्यांवरून खटके उडाले. याचदरम्यान मलायकाने ती लवकरच दुसरं लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावरून सध्या सोशल मीडिया पुन्हा मलायकाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.
आणखी वाचा : तुनिषा आत्महत्या प्रकरणात नवं वळण; अभिनेत्रीचा फोन अनलॉक होताच आले शिझानच्या कुटुंबियांचे मेसेज
मलायका आणि अमृता गप्पा मारत असताना अमृतांच्या हातातील ब्रेसलेटवरून दोघींना त्यांच्या आईच्या हातातील बांगडीची आठवण झाली, शिवाय आई जॉयस नुकत्याच अमृताला भेटल्या होत्या. यादरम्यान ही बांगडी त्या त्यांची लाडकी मुलगी अमृतालाच देणार असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला. अमृताने सांगितलेल्या या गोष्टीवर मलायका काहीच बोलली नसली तरी तिच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.
यावरून दोघींमध्ये खटके उडाले, आणि मग नंतर मलायका अमृताला म्हणाली, “काही काही गोष्टींच्या बाबतीत मी खूप भावूक होते. आपल्या दोघींपैकी जिचं दुसऱ्यांदा लग्न होणार आहे ती मी आहे, त्यामुळे या ती बांगडी मला मिळायला हवी असं वाटत नाही का तुला?” मलायकाच्या वक्तव्यामुळे तिच्या आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. गेली काही वर्ष मलायका आणि अर्जुन रिलेशनशीप मध्ये असल्याची चर्चा आहे.