बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरशी असलेल्या तिच्या नातेसंबंधांमुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं. या दोघांच्या वयात असलेल्या फरकामुळे अनेकदा सोशल मीडियावरून टीकही होताना दिसते. आता पुन्हा एकदा मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय.
मागच्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे बरीच चर्चेत होती. या शोमध्ये मलायकाने तिचे नातेसंबंध आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. पण आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबरोबरचा रोमँटीक फोटो शेअर केल्याने तिला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय.
आणखी वाचा- “आता तुझी जागा मावशी…” मलायका अरोराबद्दल मुलगा अरहान खानचं मोठं वक्तव्य
मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूर बरोबरचा एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “हॅलो २०२३” पण मलायकाचा हा बिनधास्त अंदाज नेटकऱ्यांना मात्र रुचलेला नाही. त्यांनी यावर कमेंट्स करत मलायकावर टीका केली आहे.
आणखी वाचा- Video: मलायकाशी बाचाबाची; नोरा फतेहीने रागाच्या भरात सोडला शो, पाहा नेमकं काय घडलं?
मलायका अर्जुनच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “ज्या वयात मुलाने मजा करायला हवी त्या वयात आई मजा करतेय.” दुसऱ्या एका युजरने कमेंट केलीय, “आई आणि मुलाची जोडी खूप छान दिसतेय.” याशिवाय इतरही अनेक युजर्सनी मलायका- अर्जुनच्या फोटोवर कमेंट्स करत त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला अशा ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही. ते नेहमीच याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.