Joyce Arora statement on ex husband Anil Arora Death: अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora Father Death) वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली. अनिल अरोरा यांनी मुंबईतील वांद्रे भागातील इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपवले. ही घटना घडली तेव्हा मलायकाची आई जॉयसी घरी होत्या. मलायका अरोरा पुण्यात होती. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येबद्दल कळताच मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान तिथे पोहोचला होता. अनिल अरोरांच्या आत्महत्येबद्दल जॉयसी यांनी पोलिसांना काय सांगितलं, त्याबद्दल माहिती समोर आली आहे.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या आत्महत्येनंतर काही तासांनी पोलिसांनी तिची आई जॉयसी यांचा जबाब नोंदवला आहे. न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मलायकाच्या आईने पोलिसांना सांगितलं की अनिल रोज सकाळी बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचायचे. दोघांचा घटस्फोट झाला आहे, पण तरीही ते मागील काही वर्षांपासून पुन्हा एकत्र राहत होते.
जॉयसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी त्यांना लिव्हिंग रुममध्ये अनिल यांच्या चपला दिसल्या. नंतर त्या बाल्कनीत गेल्या तेव्हा ते तिथे नव्हते. त्यांनी गॅलरीतून खाली पाहिलं, त्यावेळी इमारतीचा चौकीदार मदतीसाठी ओरडत होता. अनिल अरोरा यांना कोणताही आजार नव्हता. त्यांना फक्त गुडघे दुखत होते. त्यांनी मर्चंट नेव्हीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
दरम्यान, पोलीस अधिकारी सध्या मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास करत आहेत. मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि त्याचे कुटुंबीय अनिल अरोरा यांच्या घरी आहेत. करीना कपूर खान, सैफ अली खान, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, नेहा धुपिया, निर्माता रितेश सिधवानी यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी अनिल अरोरा यांच्या घरी भेटीसाठी गेले आहेत.
हेही वाचा – Video: बेस्ट फ्रेंड मलायका अरोराचे सांत्वन करायला पोहोचली करीना कपूर, सैफ अली खानही सोबतीला
अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी वाटत आहे, अशी माहिती या प्रकरणात पोलिसांनी दिली आहे. अनिल अरोरा ६२ वर्षांचे होते, त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.