बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायकाने आतापर्यंत बरेच खुलासे केले. मलायका तिच्या या शोमध्ये स्टँडअप कॉमेडीही करताना दिसत आहे. सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती दिलखुलासपणे बोलताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये मलायका म्हणते, “बऱ्याचदा लोक माझ्या वयाबाबत प्रश्न निर्माण करतात की मी म्हातारी दिसू लागली आहे. खरं तर हे लोक माझ्यावर जळतात.” तसेच मलायका तिच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य करते.
मलायका म्हणते, “मी व माझा एक्स आमच्या आयुष्यामध्ये पुढे गेलो आहोत. तुम्ही कधी यातून बाहेर पडणार?” मलायकाचं बोलणं ऐकून प्रेक्षकही पोट धरून हसू लागतात. त्याचबरोबरीने प्रेक्षकांमध्ये मलायकाची बहीण अमृता अरोराही बसली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – कपाळी टिळा, खांद्यावर पदर; राणादा-पाठकबाई नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी, लग्नानंतर करताहेत देवदर्शन
अमृताला उद्देशून मलायका म्हणते, “ही माझी बहीण आहे आणि तिच्याकडे श्रीमंत नवरा आहे. पण मी इतकी सुंदर असूनही इथे उभी राहून स्टँडअप कॉमेडी करत आहे.” मलायकाचं हे बोलणं ऐकून अमृताही पोट धरुन हसू लागते. मलायकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.