मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन आणि ट्रेंडी डान्समुळे चर्चेत असते. नुकतेच गुरु रंधावाने या डान्सिंग दिवासोबत त्याचे नवीन गाणे रिलीज केले. या गाण्याच्या लॉन्चिंगच्यावेळी मलायका अरोरा तिच्या अॅक्टिंग करिअरसोबतच तिच्या भीतीबद्दलही मोकळेपणाने बोलली. मलायकाला नेमकी कशाची भीती वाटते याबाबत तिने उघडउघडपणे भाष्य केलं आहे.
हेही वाचा- “मी दिल्लीत…”; दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत शाहरुख खानचा मोठा खुलासा
मलायका अरोरा म्हणाली, “मला अभिनयाच्या खूप ऑफर्स आल्या, पण इतक्या वर्षांत मी या ऑफर्सकडे कधीच लक्ष दिले नाही, मला नेहमीच डान्स आणि टीव्हीमध्ये जास्त रस होता, पण आता मी अभिनयावरही लक्ष केंद्रित करणार आहे. कुणास ठाऊक, कदाचित लवकरच तू मी अभिनय करताना दिसेल.
मलायकाला नेमकी कशाची वाटते भीती
मलायका अरोराचे गुरु रंधावासोबतचे तेरा की ख्याल हे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. रिलीज होताच हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मलायका बऱ्याच दिवसांनी एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबद्दल बोलताना मलायकाने तिची भीती व्यक्त करत म्हटले की, जर मी गाण्यांमधून खूप जास्त दिसू लागले तर माझी मागणी तितकी राहणार नाही आणि लोक मला मिस करणार नाही.
गुरु रंधावा आहे मलायकाचा चाहता
मलायकाचे कौतुक करताना गुरू रंधावा म्हणाला, “मला मलायकासोबत काम करायचे होते. कारण प्रत्येकजण तिच्यावर प्रेम करतो. मलायका म्हणाली, अनेक वर्षांपासून हो म्हणता येईल असे कोणतेच गाणे मला मिळाले नाही. मात्र, गुरुचे गाणे ऐकल्यावर मी लगेच हो म्हणाले. गुरुने जेव्हा हे गाणे मला ऐकवले तेव्हा मी अमेरिकेत होते. या गाण्यात गुरु मलायकाबरोबर नाचताना दिसत आहे. . या गाण्यातही त्याने धमाल उडवली आहे.