मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे जीम लूक्स, तिचा नवीन टॉक शो, आयटम नंबर या तिच्या कामाव्यतिरिक्त मलायका ही अर्जुन कपूरबरोबरचे नाते आणि तिचा आधीचा पती अरबाज खानपासून घेतलेल्या घटस्फोटामुळे बरीच चर्चेत असते. अभिनेत्रीने २०१७ मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर काही काळापासून अभिनेता अर्जुन कपूरसह माळेक रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं.
नुकतंच मलायकाने आधीच्या पतीचं नाव काढण्याबद्दल भाष्य केलं आहे, शिवाय हे करताना तिला बऱ्याच लोकांनी सल्लेदेखील दिले यावरही मलायकाने भाष्य केलंय. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३’ च्या मंचावर बोलताना ती म्हणाली, “माझ्या आयुष्यात या आडनावाचा खूप फायदा झाला पण मला वाटत नाही की मी या गोष्टीवर आयुष्यभर अवलंबून राहावं. मला असे अजिबात वाटत नाही की मला आयुष्यात जे काही करायचे होते ते सर्व मला मिळाले. या मोठ्या आडनावामुळे मला संधी मिळाली परंतु मला वाटते की माझं विवाहित आडनाव काहीही असो मला जीव तोडून काम करावंच लागणार आहे. आणि या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी मला कठोर परिश्रम करून स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.”
आणखी वाचा : Video : पडद्याआड शहनाज गिल आणि सारा अली खानने केलं ‘असं’ कृत्य; व्हिडिओ होतोय व्हायरल
याबरोबरच पतीचे आडनाव न लावण्याबद्दलही तिला बऱ्याच लोकांनी वेगवेगळे सल्ले दिले. याबद्दल बोलताना मलायका म्हणाली, “बरेच लोक मला सांगत होते की मी आडनाव हटवण्याची सर्वात मोठी चूक करत आहे. काही लोक म्हणायचे की मला आडनावाचे महत्त्व कळत नाही. मला माझ्या पूर्व पतीच्या म्हणजेच अरबाजच्या कुटुंबाबद्दल खूप आदर आहे, त्यांनी मला खूप प्रेम दिले आहे आणि मी कुटुंबाचा एक भाग आहे, पण माझ्यासाठी, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. पतीचे आडनाव काढून जेव्हा मी माहेरचे आडनाव लावले तेव्हा यामुळे मला असे वाटले की मी आयुष्यात स्वतःच्या बाळवार काहीतरी करू शकते.”
दरम्यान काही दिवसांपूर्वीच असंही म्हटलं होतं की मलायका आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहानचं अर्जुन कपूरशी चांगलं बॉन्डिंग नाही त्यामुळे तो आता वडील अरबाज खानबरोबर राहत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं १९९८ मध्ये लग्न झालं होतं आणि २०१७ मध्ये दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. या दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.