अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बॉलीवूडची लोकप्रिय जोडी म्हणून दोघांकडे पाहिलं जातं. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या नात्याला सुरुवात झाल्यामुळे दोघांनाही सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. अशावेळी अर्जुन-मलायका नेहमीच त्यांच्या ट्रोलर्सला प्रत्युत्तर देत असतात. परंतु, सध्या अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : Video : ऋतुजा बागवेने नव्या घरात केली खास सजावट, भिंतीवर साकारलेल्या विठ्ठलाच्या नावाने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांच लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये, “एका स्त्रीला तुम्ही जशी वागणूक देता तशीच ती वागते. जर तुम्हाला तिची वागणूक आवडत नसेल, तर तुम्ही तिच्याशी कसे वागताय हे सुद्धा एकदा पाहा.” अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने आजारपणामुळे गणपती बाप्पाला घातलं होतं ‘हे’ साकडं, खुलासा करत म्हणाली…

अलीकडेच सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कुशा कपिलाने घटस्फोटाची घोषणा केल्यावर तिचं नाव अर्जुन कपूरबरोबर जोडण्यात आलं होतं. दोघांना करण जोहरच्या घरी एकत्र जाताना पाहण्यात आलं. त्यानंतर करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीतील दोघांचा ग्रुप फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. परंतु कुशाने या अफवा असल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा : “मित्रही आहेत आता होणारे पती…”, साखरपुड्याच्या निमित्ताने अक्षराचा अधिपतीसाठी खास उखाणा

मलायकाने बोनी कपूर, अनिल कपूर, अंशुला कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांना अनफॉलो केल्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून मलायकाने अर्जुनच्या सोशल मीडियावरील एकाही पोस्टवर कमेंट किंवा लाइक केलेलं नाही. परंतु, ‘इंडिया टूडे’ला मलायका आणि अर्जुनच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकत्र आहेत फक्त, मध्यंतरी कुशा कपिलाचं नाव अर्जुनसह जोडलं गेल्यामुळे ते नाराज होते. दरम्यान, मलायका अरोराने २०१९ मध्ये अर्जुनसह वाढदिवसाची पोस्ट शेअर करत त्यांचं नातं अधिकृत केलं होतं.

Story img Loader