Malaika Arora Father Passed Away: अभिनेत्री व मॉडेल मलायका अरोराचे (Malaika Arora Video) वडील अनिल अरोरा यांनी आज (११ सप्टेंबर रोजी) आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथे ते ज्या इमारतीत राहायचे, त्या इमारतीच्या छतावरून त्यांनी उडी घेत आयुष्य संपवलं. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अनिल अरोरा यांनी धक्कादायक पाऊल उचललं.
अनिल अरोरा यांचं निधन झालं तेव्हा मलायका अरोरा मुंबईत नव्हती. ती कामानिमित्त पुण्यात होती. आता ती वांद्रे येथील तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली आहे. मलायका घरी पोहोचली तेव्हाचे तिचे काही व्हिडीओ पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. मलायकाची बहीण अमृतादेखील या व्हिडीओत दिसत आहे. पल्लव पालिवाल व वूम्प्ला या अकाउंटवरून हे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
Video: मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, अरबाज खान पोहोचला घटनास्थळी, व्हिडीओ आला समोर
Arbaz Khan at Malaika Arora Father Home: मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं कळताच तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान सर्वात आधी तिथे पोहोचला होता. त्यानंतर अरबाजचे वडील सलीम खान, आई सलमा, त्याचा भाऊ सोहेल हेदेखील पोहोचले आहेत.
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Arjun Kapoor at Anil Arora Home: मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही मलायकाच्या वडिलांच्या घरी पोहोचला आहे. त्याचेही फोटो समोर आले आहेत.
दरम्यान, मलायकाच्या वडिलांनी आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.