Malaika Arora post about Father Death: बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल मलायका अरोराचे वडील अनिल मेहता (Anil Mehta Death) यांचे निधन झाले आहे. अनिल मेहता यांनी आज सकाळी इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ९ वाजता मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. वडिलांच्या निधनाबद्दल मलायकाने पहिली पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलायकाचे वडील अनिल मेहता यांचे निधन झाले तेव्हा ती मुंबईत नव्हती. अभिनेत्री पुण्यात होती आणि वडिलांच्या निधनाबद्दल कळाल्यावर ती दुपारी मुंबईत पोहोचली. मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान, त्याचे कुटुंबीय, अर्जुन कपूर हे सर्वजण मलायका येण्याआधी तिच्या वडिलांच्या घरी पोहोचले होते.

हेही वाचा – चौकीदार मदतीसाठी ओरडत होता अन्…; मलायकाच्या आईने सांगितलं सकाळी काय घडलं? घटस्फोटानंतरही एकत्र राहायचे अनिल -जॉयसी

“आमचे प्रिय बाबा, अनिल मेहता यांचे निधन झाल्याची माहिती देताना खूप दु:ख होत आहे. ते खूप चांगले आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे सर्वात चांगले मित्र होते. त्यांच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांना गोपनीयतेची विनंती करतो,” असं मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये तिने आई जॉयसी, तसेच तिची बहीण अमृता आणि कुटुंबातील इतर सदस्यांची नावं लिहिली आहे. मलायकाचे वडील अनिल कुलदीप मेहता ६२ वर्षांचे होते.

मलायका अरोराची पोस्ट –

हेही वाचा – Video: मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाबद्दल मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सुसाईड नोट सापडली का? म्हणाले, “अनिल अरोरा यांचा…”

मलायकाच्या या पोस्टवर ओरी, दिया मिर्झा, मसाबा गुप्ता, अदिती राव हैदरी, झरीन खान, वाणी कपूर, करिश्मा तन्ना, निमृत कौर, गौहर खान, सोफी चौधरी, अनन्या पांडेची आई भावना पांडे यांनी कमेंट करून अनिल मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच कमेंट्स करून चाहते मलायका व तिच्या कुटुंबाला धीर देत आहेत.

हेही वाचा – Video: बेस्ट फ्रेंड मलायका अरोराचे सांत्वन करायला पोहोचली करीना कपूर, सैफ अली खानही सोबतीला

अनिल मेहता हे मलायका अरोराचे सावत्र वडील होते. अनिल मेहता व जॉयसी यांचा घटस्फोट झाला होता, तरी मागील काही वर्षांपासून घटस्फोटानंतरही दोघे एकत्र राहायचे. मलायका तिच्या आई-वडिलांबरोबर खूप वेळा फोटो शेअर करायची. अनेकदा कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसायचे. सण-उत्सव ते एकत्र साजरे करायचे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora reacts on father anil mehta death shared post on instagram hrc