मलायका अरोरा व अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अर्जुनने आम्ही अजूनही लग्न करण्याचा विचार केला नाही असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला. मलायका व अर्जुन एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले आहेत. खुलेपणाने ते एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता मलायकाने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.
‘ब्राइड्स पत्रिका’ला दिलेल्या मुलाखतीत मलायकाला तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावेळी मलायका म्हणाली, “हो, मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण मी दुसरं लग्न कधी करणार? याचं उत्तर आता देऊ शकत नाही. कारण मला काही गोष्टी सरप्राइज म्हणून ठेवायच्या आहेत”.
आणखी वाचा – Video : महेश मांजरेकरांच्या लेकाचं हॉटेल पाहिलंत का? ‘या’ खास पदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
“आधीच मी सगळं सांगितलं तर सगळ्या गोष्टींमधील मजा निघून जाईल. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला एक गोष्ट सांगण्यात आली होती की, एक नातं हे एखाद्या झाडाप्रमाणे असतं. तुम्ही बी पेरता. त्यानंतर ते रोप वाढवण्यासाठी तुम्हाला सतत पाणी घालावं लागतं. झाडाप्रमाणेच नात्याचंही तसंच आहे”.
पुढे मलायका म्हणाली, “अर्जुन त्याच्या वयापेक्षा खूप समजुतदार आहे. मला अर्जुनबरोबर घरही सेट करायचं आहे. आमच्या नात्यामध्ये आम्ही एक पाऊल पुढे जाण्यास दोघंही तयार आहोत”. मलायका व अरबाज खान यांचा २०१७मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका व अर्जुन एकमेकांना डेट करु लागले. आता दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.