Malaika Arora : काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर अर्जुन कपूरने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात तो सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे यावर सर्व चाहते मलायकाच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. अशात अभिनेत्रीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय म्हणाली मलायका?
मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने तिचं रिलेशनशिप स्टेटस सध्या काय आहे, याची माहिती सांगितली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये “सध्याची माझी स्थिती काय”, असं लिहिलं आहे. त्यावर पुढे तीन पर्याय दिले आहेत. यात पहिला पर्याय ‘रिलेशनशिपमध्ये’ असा आहे. दुसरा पर्याय ‘सिंगल’ असा आहे, तर तिसऱ्या पर्यायासमोर ‘हेहेहे’, असं लिहिलं आहे. मलायकाने यातील तिसरा पर्याय हायलाईट केला आहे. तिने ही स्टोरी पोस्ट करत यावर अन्य कोणतीही माहिती लिहिलेली नाही.
हेही वाचा :“एक्सच्या गिफ्ट्ससाठी मी वेड्यासारखे पैसे…”, समांथा रुथ प्रभूचा दुसरं लग्न करणाऱ्या नागा चैतन्यला टोला?
दरम्यान, अर्जुन कपूरचीदेखील एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. यामध्ये त्यानं लिहिले आहे, “काही दिवस तुम्ही ठीक असता, काही दिवस तुम्हाला छान वाटतं, काही दिवस आनंदी असल्यासारखं वाटतं, काही दिवस तुम्ही फक्त जगत आहात आणि सारं काही ओके आहे.”
ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान अर्जुन कपूरने दिवाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी तो येथे आला होता. त्यावेळी “मी सिंगल आहे”, असं त्याने सांगितलं होतं. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये अर्जुनच्या हातात माईक येताच सर्वजण मलायका, मलायका असं ओरडू लागले होते. त्यावर अर्जुनने “मी सिंगल आहे”, असं म्हटलं होतं.
तसेच अर्जुनने ‘हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तो त्याच्या जीवनातील विविध गोष्टींमुळे किती एकटा पडला आणि त्यातून त्याने स्वत:ला कसे सावरले हे सांगितले होते. तसेच त्याने यातही अभिनेत्री मलायका अरोराबरोबर ब्रेकअप झाल्याची कबुलीही दिली होती.
मुलाखतीत अर्जुन कपूर म्हणाला की, “मला असं वाटतं, सध्या मी ज्या स्थितीत आहे, त्यानुसार मी फक्त स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. स्वार्थी वागण्याला अनेकजण चुकीच्या पद्धतीचे समजतात. मात्र, माझं वागणं स्वार्थी नाही असं मला वाटतं. माझा एकटेपणा फक्त आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींमुळे होता.”, असं अर्जुन कपूर म्हणाला होता.
हेही वाचा : “महिलेने मला तिच्या कडेवर असलेलं बाळ…”, मधुराणी प्रभुलकरने सांगितला चाहतीचा मजेशीर किस्सा, पाहा व्हिडीओ
मलायकाने आजवर बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने आणि नृत्याने अनेकांच्या काळजात घर केलं आहे. सध्या ती ५१ वर्षांची आहे. मात्र आजही तिच्या सुंदरतेचे लाखो चाहते आहेत. तर, अर्जुन कपूरनेदेखील बॉलीवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. नुकताच तो ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकला आहे.