मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूर रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघेही एकत्र फिरताना वेळ घालवताना दिसतात. दोघांनी आपल्या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली आहे. बऱ्याचदा ते एकमेकांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मलायका अरोराने अर्जुन कपूरचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
मलायकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्जुन कपूरने कपडे परिधान केलेले नाहीत. या फोटोमध्ये तो हात पाय पसरून सोफ्यावर बसलेला दिसत आहे. त्याचं शरीर त्याने उशीच्या मदतीने झाकलं आहे. अभिनेत्याचा हा फोटो शेअर करत मलायकाने ‘माय व्हेरी ओन लेझी बॉय’ असं कॅप्शन दिलं आहे. मलायकाने या फोटोसोबत अर्जुन कपूरलाही टॅग केले आहे. अर्जुनने ही स्टोरी पांढरा हार्ट इमोजी टाकत रिपोस्ट केली आहे.
मलायका अरोरा २०१७ मध्ये अरबाज खानपासून विभक्त झाली आणि तेव्हापासून ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करतात. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेकवेळा त्यांच्यावर टीकाही होते. पण, त्याची पर्वा न करता ते आपलं प्रेम व्यक्त करत असतात.