अभिनेत्री मलायका अरोराचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशननंतर दोन दिवसांनी ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. पापाराझींनी शूट केलेला तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या उजव्या पायाच्या झालेल्या जखमेने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते काळजी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

मलायका अरोरा नुकतीच मुंबईतील एका सलूनबाहेर दिसली होती. तेव्हाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने शॉर्ट्स घातले होते. त्यावेळी तिच्या उजव्या मांडीवर काळ्या रंगाची जखम दिसत होती. मलायका ही जखमेची काळी खूण लपवतानाही दिसली.

मलायकाच्या पायावर झालेल्या दुखापतीच्या खुणा पाहून नेटकरी कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं, ‘काय झालं?’ दुसर्‍याने लिहिलं, ‘तू पडली होतीस का?’ ‘तुझ्या मांडीला काय झालं?’ असं तिसऱ्याने विचारलं. अशाच प्रकारे लोक कमेंट करत आहेत, मात्र, अभिनेत्रीच्या बाजूने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. ती अनेक इव्हेंट्सला हजेरी लावत असते. ती टीव्हीवर रिअॅलिटी शोदेखील जज करते. लवकरच ती ‘झलक दिखला जा’ च्या नवीन पर्वात दिसणार आहे.