बॉलिवूडची बहुचर्चित जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी व्हेकेशन तर बॉलिवूड पार्टी तर कधी एखादा इव्हेंट हे दोघंही नेहमीच एकत्र दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारे मलायका आणि अर्जुन अनेकदा एकमेकांसाठी खास पोस्ट शेअर करत असतात. अनेकदा दोघंही डिनर डेट किंवा लंचलाही गेलेले दिसतात. आताही या दोघांच्या डिनर डेटचा एक व्हिडीओ समोर आला आहे पण या व्हिडीओनंतर मलायकाला जोरदार ट्रोल केलं जातंय.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांना डिनर डेटनंतर एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दोघंही कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी दोघांनीही ब्लॅक आऊटफिट्स परिधान केले होते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये फोटोग्राफर्सना हाय हॅलो करून दोघंही आपल्या कारमध्ये बसून निघून जाताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मलायका अरोराला मात्र नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

आणखी वाचा- “घटस्फोटानंतर आम्ही जास्त…”; मलायका अरोराबद्दलच्या प्रश्नावर अरबाज खान दिली प्रतिक्रिया

मलायका अरोराला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचं कारणही तसंच आहे. १२ नोव्हेंबरला प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याच्या अंत्ययात्रेसाठी अनेक टीव्ही कलाकार उपस्थित होते. या सगळ्यात मलायका अरोराही दिसून आली होती. ज्यामुळे अनेकांना याचं आश्चर्य वाटलं. पण त्याच रात्री मलायका अरोरा अर्जुन कपूरबरोबर डिनर डेटवर गेल्याने सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “सकाळी शोकसभा आणि रात्री डिनर डेट” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “तुझ्या मुलासाठी असं करून काय आदर्श सेट करत आहेस?” तर आणखी काही युजर्सनी या जोडीवर टीका करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा- “तुला पाहून…” मलायका अरोराच्या ‘त्या’ रिल व्हिडीओवर करीना कपूरची कमेंट व्हायरल

malaika arora trolled

दरम्यान काही दिवसांपूर्वी मलायका तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे बरीच चर्चेत आली होती. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिलं होतं, “…आणि मी ‘हो’ म्हटलं” मलायकाने या पोस्टसह स्वतःचा एक खूपच बोलका फोटो शेअर केला होता. त्यानंतर मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. मात्र काही वेळाने तिने स्पष्ट केलं की तिची ही पोस्ट तिच्या आगामी शोबद्दल होती.

Story img Loader