बॉलीवूड अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने रविवारी (२४ डिसेंबर रोजी) शुरा खानशी लग्न केलं. अर्पिता खानच्या घरी या दोघांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अशातच मलायका अरोराच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे.

मलायका अरोराचा हा व्हिडीओ अरबाज खानच्या लग्नाच्या दिवशीचा आहे. ‘बॉलीवूड मोबी’ या पापाराझी अकाउंटवरून तिचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मलायका पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. सोबतच तिने निळ्या रंगाचे ब्लेझर कॅरी केले होते. मलायका या व्हिडीओत कमालीची सुंदर दिसत आहे. अरबाजच्या लग्नाच्या संध्याकाळचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये ती चाहत्यांबरोबर पोज देताना दिसत आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

५६ वर्षीय अरबाज खानने केलं दुसरं लग्न, शुरा खानशी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाला…

मलायकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अरबाजच्या लग्नाचा उल्लेख करत कमेंट्स केल्या आहेत. ‘तुला लग्नाला बोलावलं नाही का?’ ‘अरबाज खानचं लग्न झालंय’, ‘मलायका अरोराच्या पहिल्या पतीने लग्न केलंय’, अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.

comments
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
comments
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अरबाजच्या लग्नाला त्याचा व मलायकाचा मुलगा अरहान खानने हजेरी लावली होती. त्याने नवविवाहीत जोडप्याबरोबर फोटोही काढले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अरबाज खान व मलायका अरोरा यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. १९ वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर मलायका अरोरा व अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत आहेत. तर अरबाज जॉर्जियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि आता त्याने शुरा खानशी लग्नगाठ बांधली.

Story img Loader