बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज ३८ वा वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतून सध्या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. याचदरम्यान अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर रोमॅंटिक पोस्ट शेअर करीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कोकणात जाऊन घडवतेय मडकी, ‘तो’ फोटो शेअर करीत म्हणाली “कळलंय आयुष्य मला…”
गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन-मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकत्र फिरताना वेळ घालवताना दिसतात. दोघांनी अनेकदा आपल्या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली आहे. बऱ्याचदा ते एकमेकांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आज अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने खास पोस्ट शेअर केली आहे. मलायकाने इन्स्टाग्रामवर अर्जुनचे काही चांगले, तर काही मजेशीर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये मलायका लिहिते की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय सनशाईन, थिंकर, गूफी, शॉपोहोलिक, माय हँडसम…. अर्जुन कपूर”
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनची सावत्र बहीण जान्हवी कपूरने सुद्धा इन्स्टाग्रामवर अभिनेत्याचा एआय फोटो शेअर करून त्यास ” तुला वाढदिवसाच्या खूप खपू शुभेच्छा अर्जुन दादा…” असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा : “मरेपर्यंत संघर्ष आहेच” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे स्पष्ट मत; म्हणाला, “खिशात पैसे…”
दरम्यान, अर्जुनने काल रात्री बॉलीवूडमधील त्याच्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. या वेळी अर्जुनच्या खास मित्रांसह त्याची गर्लफ्रेंड मलायका आणि बहीण अंशुला कपूर तिच्या प्रियकराबरोबर उपस्थित होती. या पार्टीत मलायकाने “छैय्या, छैय्या…” गाण्यावर केलेल्या डान्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मलायकाला चांगलेच ट्रोल केले आहे.