२००४ यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ चित्रपटातून अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने बोल्डनेसच्या साऱ्या सीमा ओलांडल्या. हा चित्रपट चांगलाच गाजला तो यातील गाण्यांमुळे आणि मल्लिका शेरावत आणि इम्रान हाशमी यांच्यामधील बोल्ड सीन्समुळे. त्यानंतर मल्लिका शेरावतवर बोल्ड अभिनेत्रीचा शिक्का बसला तो कायमचाच.
नंतर काही चित्रपटात काम केल्यावर मात्र मल्लिकाने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. सध्या मल्लिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे फिटनेस व्हिडिओज आणि सुट्टी एंजॉय करतानाचे व्हिडिओज चांगलेच व्हायरल होत असतात. नुकतंच मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील काही फोटोज शेअर केले आहेत.
आणखी वाचा : हॉटेलमध्ये गाणं गाणारा ते लोकप्रिय युट्यूबर; ओटीटीवर झळकणारा भुवन बाम कमावतो ‘इतके’ कोटी
मल्लिका सध्या अंदमानमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. ‘ताज’ हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये मल्लिकाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केलं आहे. स्विमिंग पूलमध्ये मल्लिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या बिकिनीमधला मल्लिकाचा बोल्ड अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. मल्लिकाचा हा हॉट लूक पाहून चाहत्यांनी ‘मर्डर ४’ या चित्रपटाची मागणी केली आहे, तर काहींनी कॉमेंटमध्ये जुन्या चित्रपटातील ‘भिगे होंट तेरे’ या गाण्याची आठवण काढली आहे.
सध्या भगव्या बिकिनीवरून एवढा गदारोळ माजलेला असतानाही मल्लिकाचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. मल्लिकाने ‘प्यार के साइड इफेक्ट’, ‘वेल्कम’, ‘डबल धमाल’, अशा सुपरहीट चित्रपटात काम केलं आहे. नुकतंच मल्लिका रजत कपूर यांच्या ‘आरकेय’ या चित्रपटात झळकली.