बॉलीवूडमध्ये एकेकाळी मल्टीस्टारर विनोदी चित्रपटांचा ट्रेंड होता. अभिनेत्री मल्लिका शेरावतने अशा बऱ्याच मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपटांत काम केलं आहे. तिचा ‘विकी विद्या का वोह वाला वीडियो’ हा आगामी चित्रपटसुद्धा एक मल्टीस्टारर कॉमेडी सिनेमा आहे. याच सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आधी, मल्लिका शेरावतने एका चित्रपटाच्या सेटवर एका हिरोने तिला दिलेल्या त्रासाचा अनुभव शेअर केला असून हा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्लिका म्हणाली की हा प्रसंग दुबईमध्ये एका ‘मल्टीस्टारर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला, ज्यामध्ये ती विनोदी भूमिका साकारत होती. व्हिडीओमध्ये मल्लिकाने तिच्या भयानक अनुभवाचा उल्लेख केला, जो एका सुपरहिट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, असं ती म्हणाली.

हेही वाचा…मराठमोळी शर्वरी वाघ अन् आलिया भट्टच्या ‘अल्फा’ची रिलीज डेट ठरली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

तो हिरो रात्री माझ्या खोलीचं दार ठोठावत असे

“मी एका मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दुबईमध्ये होते. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता आणि तो सुपरहिट ठरला होता. प्रेक्षकांना तो खूप आवडला, त्यात मी विनोदी भूमिका साकारली होती. त्या चित्रपटाचा हिरो रात्री १२ वाजता माझ्या खोलीचं दार ठोठावत असे”, असे मल्लिका शेरावतने ‘फर्स्ट इंडिया फिल्मी’ या प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

“एका क्षणी वाटलं की…”

मल्लिका पुढे म्हणाली, “तो इतक्या जोरात दार ठोठावत असे की एका क्षणी मला वाटलं की तो नायक दरवाजा तोडून आत येईल, त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये यायचे होते, पण मी ठामपणे ‘नाही’ म्हटले. त्या घटनेनंतर त्याने कधीच माझ्याबरोबर काम केले नाही,” असे मल्लिका शेरावतने स्पष्ट केले.

हेही वाचा…पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’चा जलवा! तीन आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

मल्लिका शेरावत लवकरच ‘विकी विद्या का वोह वाला वीडियो’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. हा कॉमेडी चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून, आलिया भट्टच्या ‘जिगरा’ या अ‍ॅक्शन चित्रपटाशी टक्कर देणार आहे.