मर्डर फेम अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड भूमिकांबद्दल प्रसिद्ध आहे. नुकतेच एका पॉडकास्टमध्ये मल्लिका शेरावतने हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये मल्लिकाने तिच्या कामाबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्तींशी झालेल्या भेटींचा उल्लेख केला. मल्लिका शेरावतने अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर अलाहबादिया, ज्याचे ‘बीअरबायसेप्स’ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे, त्यावर तो अनेक पाहुण्यांची मुलाखत घेतो. नुकतंच मल्लिका रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आली होती. रणवीरने आपल्या इन्स्टाग्रामवर मल्लिका शेरावतबरोबरची पॉडकास्ट क्लिप शेअर करताना, “मल्लिका शेरावत ऑन जेफ बेझोस” असे लिहिले. या व्हिडीओत मल्लिकाने जेफ बेझोस यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला. रणवीर तिला विचारल, “तू जेफ बेझोस यांच्या घरी गेली होतीस का?” त्यावर मल्लिका उत्तर देते, “हो, मी त्यांच्या वॉशिंग्टन डीसीमधील घरी गेले होते.”

हेही वाचा…‘बाहुबली’ प्रभास ४४ व्या वर्षी चढणार बोहल्यावर? अभिनेत्याच्या काकूचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या…

जेफ बेझोसबद्दल मल्लिका म्हणाली…

रणवीरने मल्लिकाला विचारले, “जेफ बेझोस कसे आहेत ?” यावर मल्लिकाने उत्तर दिलं, “ते खूप फोकस्ड आहे.” तिने पुढे जेफ बेझोस काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल कसा साधतात, याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “जेफ विकेंडला काम करत नाहीत, तर आराम करतात किंवा कुटुंबाबरोबर वेळ घालवतात.” ती पुढे सांगते, “माझी आणि त्याची पहिली भेट एका पार्टीत झाली होती, त्याच पार्टीत त्यांनी मला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते, तो अनुभव खूप छान होता.”

या पॉडकास्टचा संपूर्ण व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. यामध्ये मल्लिका शेरावत सांगते की, “हरियाणामधून आलेली एक साधी मुलगी” जेव्हा जेफ बेझोस यांच्यासारख्या व्यक्तीला भेटते हे तिच्यासाठी स्वप्नवत होतं.

हेही वाचा…“स्त्रीविषयक चित्रपट…”, कंगना रनौतने आलिया भट्टवर केली अप्रत्यक्ष केली टीका; म्हणाली…

सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

पॉडकास्टमध्ये मल्लिका शेरावतने सांगितलेल्या किश्श्यांबद्दल प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले आहे. एका व्यक्तीने लिहिले, “ती खूपच सुंदर आहे आणि ती तिच्या काळापेक्षा खूप पुढे होती.” दुसऱ्याने लिहिले, “मला तिचं बोलणं खूप आवडलं.” तिसऱ्या चाहत्याने लिहिले, “मला कल्पनाही नव्हती की मल्लिका इतकी सुसंस्कृत आणि बोलकी आहे.”

मल्लिका शेरावत कमला हॅरिस यांना भेटली तेव्हा

पॉडकास्टमध्ये मल्लिका शेरावतने कमला हॅरिस यांच्याबरोबरच्या भेटीबद्दल सांगितले. ती जवळपास दशकभरापूर्वी त्यांना भेटली होती. मल्लिका उत्सुकतेने सांगते की, “जेव्हा मी कमला हॅरिस यांना भेटले, तेव्हा मला कल्पना नव्हती की त्या भविष्यात अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होतील. अशा व्यक्तींना भेटणं खूपच अवास्तव वाटतं.”

हेही वाचा…“पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून…”, आलिया भट्टच्या तोंडून कौतुकाचे ‘ते’ शब्द ऐकताच समांथाचे डोळे पाणावले; व्हिडीओ व्हायरल

याव्यतिरिक्त, मल्लिका शेरावतने पॉडकास्टमध्ये बॉलीवूडमधील वास्तविकता, चित्रपटसृष्टीतील महिलांच्या बदलत्या प्रतिमा, तिचे सिंगल असणं, भारतीय आणि पाश्चात्त्य संस्कृतीतील फरक या विषयांवरही मोकळेपणाने चर्चा केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallika sherawat talks about jeff bezos and kamala harris meeting moment psg