शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही थांबायचं नाव घेत नाही. सोशल मीडियावर आता ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंडदेखील जोर धरू लागला आहे. चित्रपटसृष्टीतीलही बऱ्याच लोकांनी या वादात शाहरुख खानला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये आता दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांचाची समावेश झाला आहे. पृथ्वीराजनेसुद्धा याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान पृथ्वीराजने “पठाण हा बॉक्स ऑफिसवर चांगला हीट ठरेल आणि बॉलिवूडचे जुने दिवस पुन्हा येतील.” असं भाकीत केलं होतं, पण आता ‘पठाण’वरून सुरू असलेल्या वादावर त्याने आपली खंत व्यक्त केली आहे. ‘कापा’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी एका प्रेस मीटिंगदरम्यान पृथ्वीराजला पठाण वादाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा : क्रिस्तोफर नोलनच्या बहुचर्चित ‘ओपनहायमर’चा ट्रेलर प्रदर्शित; अणूबॉम्बच्या जनकाची कथा लवकरच उलगडणार

पृथ्वीराज म्हणाला, “एखाद्या कलाकृतीला अशाप्रकारच्या विरोधाला सामोरं जावं लागतंय हे खूप दुर्दैवी आहे.” शिवाय अशा पद्धतीने एखाद्या कलाकारावर टीका करणं हे विघातक आहे असंही पृथ्वीराजने नमूद केलं. आधी ‘पठाण’बद्दल भविष्यवाणी करणाऱ्या पृथ्वीराजने त्याच चित्रपटाची बाजू घेत त्याचं मत मांडलं आहे.

पृथ्वीराज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफबरोबर पृथ्वीराजदेखील मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळेच पृथ्वीराज बॉलिवूड चित्रपटाच्या बाजूने बोलत असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. शाहरुख खान, दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम यांचा ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malyalam actor prithviraj sukumaran speaks about shahrukh khan pathaan controversy avn