१९९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी अलीकडेच अनेक वर्षानंतर भारतात परतली. ती देशात येताच तिच्यावर अनेक बातम्या झाल्या. सोशल मीडियावरही ती देशात परतल्या अनेक चर्चा झाल्या. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर तिच्या करिअरवर परिणाम झाला आणि ती जवळपास २५ वर्षे भारताबाहेर राहिली. काही दिवसांपूर्वी भारतात परतलेली ही अभिनेत्रीने आता संन्यास घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता संन्यासी बनली आहे. ती आता अभिनेत्री म्हणून नव्हे, तर महामंडलेश्वर म्हणून ओळखली जाईल. २५ वर्षांनंतर ममता भारतात महाकुंभासाठी परतली आहे . प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर आलेल्या महाकुंभात ती भगव्या वेशात दिसली. तिच्या कपाळावर चंदनाचा गंध, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर झोळी होती. ती किन्नर आखाड्यात पोहोचली आणि तिने आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली.

आता असे सांगितले जात आहे की तिचा पट्टाभिषेक होणार आहे. ममता कुलकर्णीने डिसेंबर २०२४ मध्ये एक व्हिडिओ शेअर करून सांगितले होते की त्या २५ वर्षांनंतर भारतात परतली आहे. ती २०१३ साली झालेल्या कुंभमेळ्यात त्या सहभागी झाली होती, आणि बरोबर १२ वर्षांनंतर ती २०२५ च्या महाकुंभासाठी परतली आहे. आता भारतात परतल्यावर या ५२ वर्षीय अभिनेत्रीने संन्यास घ्यायचा घेण्याचा निर्णय घेतला असून ती आता नव्या नावाने ओळखली जाणार आहे.

‘क्रांतिवीर’, ‘करण अर्जुन’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘आंदोलन’ आणि ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री आता संन्यासी बनली आहे. महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णीचे नाव बदलणार आहे. किन्नर आखाड्यातील काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत, ज्यात ती महाकुंभ आणि धर्म-आध्यात्म यावर चर्चा करताना दिसली. तिने संगमात डुबकीही मारली आणि हे क्षण त्यांच्या जीवनातील सौभाग्याचे असल्याचे तिने सांगितले.

महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णी ‘ममता नंद गिरी’ या नावाने ओळखले जाईल. ती म्हणाली की तिचा जन्म देवासाठीच झाला आहे. आणि ती यापुढे पुन्हा कधीही अभिनय क्षेत्रात दिसणार नाही. तिने मेकअप करणेही पूर्णतः सोडून दिले आहे असे ती म्हणाली.

प्रयागराजमध्ये आचार्य महामंडलेश्वर यांची भेट घेतल्यानंतर असे सांगितले गेले की, ममता कुलकर्णी तिच्या सान्निध्यात महामंडलेश्वर बनेल. आज २४ जानेवारी २०२५ संध्याकाळपर्यंत हा प्रक्रिया पूर्ण होईल. ती संगमातील संतांबरोबर स्नान करेल, पिंडदान करेल, आणि महामंडलेश्वर ही उपाधी स्वीकारेन.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamta kulkarni returns to india will become mahanmandleshwar in mahakumbh prayagraj psg