९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni)ची ओळख आहे. १४ वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील कारकि‍र्दीमध्ये अभिनेत्रीने ४० चित्रपटांत काम केले. अक्षय कुमार, सैफ अली खान, शाहरुख खान, सलमान खान अशा अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर ममता कुलकर्णीने चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. १९९५ ला प्रदर्शित झालेल्या करण-अर्जुन चित्रपटात ममता कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, करण-अर्जुन चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान-शाहरुख खानने हसून तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला होता, अशी आठवण सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोपर्यंत सलमानने मला थांबवले अन्…

ममता कुलकर्णीने इंडिया टीव्हीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत करण अर्जुन चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगितली. ममता कुलकर्णीने म्हटले, “चिन्नी प्रकाश हे करण अर्जुनचे कोरिओग्राफर होते. सलमान व शाहरुख दोघेही शूटिंगसाठी गेले होते आणि मी एकटीच बसले होते. जवजवळ दीड तासानंतर चिन्नी प्रकाश यांच्या असिस्टंटने माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मी विचारले की काय झाले, तर मला मास्टरजींनी बोलवल्याचे सांगितले. त्यानंतर मी पायऱ्या चढत असताना मला सलमान व शाहरुख दिसले. ते माझ्यावर हसले आणि पुढे गेले. मी शांत राहिले. त्यावेळी सायंकाळाचे ८ वाजले होते. मी मास्टरजींकडे गेले, तर त्यांनी मला सांगितले की, अमुक स्टेप तू एकटीने करायची आहेस. ते ऐकल्यानंतर तुम्ही काय बोलत आहात, असा विचार माझ्या डोक्यात आला होता.

“दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला शॉट माझा होता. मी दिलेल्या अगदी सुरुवातीच्याच शॉटला परवानगी मिळाली. तेव्हा मला शाहरुख व सलमान झाडांच्या मागे दिसले. ते तिथून माझ्याकडे बघून हसत होते. त्यानंतर त्यांचा शॉट होता. त्यांना त्यांच्या गुडघ्यावर बसून ५,००० लोकांमध्ये ती स्टेप करायची होती. त्यांनी खूप रिटेक्स घेतले, त्यामुळे दिग्दर्शकाने पॅक अप केले. आम्ही सगळे आमच्या रूममध्ये पळालो. मला माहीत होते की, त्यांनी काल संध्याकाळी काय केले होते. त्यामुळे ते जेव्हा खोलीकडे पळाले तेव्हा मीदेखील पळाले. सगळ्या स्टेप कोरिओग्राफरने मला देऊ नयेत, असे करण्याची संधी सलमान-शाहरूखला मिळू नये, असे मला वाटत होते. जोपर्यंत मी तिथे पोहोचले, तोपर्यंत सलमानने मला थांबवले आणि माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. असा किस्सा घडला होता. सलमान खूप खोडकर होता. मी खूप वक्तशीर होते. तो नेहमी मला चिडवत असे, खोड्या काढत असे आणि मी त्याला गप्प बस, असे म्हणत असे”, अशी आठवण ममता कुलकर्णीने सांगितली आहे.

दरम्यान, ममता कुलकर्णी काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. महाकुंभ मेळ्यात ममता कुलकर्णीने संन्यास घेतला होता. तिला दिल्या गेलेल्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता हे पद काढून घेण्यात आले आहे.