९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मराठमोळी ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर मुंबईत परत आली आहे. आता तिने मुंबईत परतण्याबाबत आणि विक्की गोस्वामीबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. ममताने बॉलीवूडमध्ये पुनरागमन करायचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

विक्की गोस्वामीबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली, “माझा डी (ड्रग) जगाशी काहीही संबंध नाही, कारण मी या लोकांना कधीही भेटले नाही. होय, मी विक्की गोस्वामीशी कनेक्ट झाले. १९९६ मध्ये माझा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि त्या काळात माझ्या आयुष्यात एक गुरू आला. दुबईत तुरुंगात असताना विक्कीने मला फोन करून भेटायला बोलावलं. मी त्याला भेटले आणि मी १२ वर्षे घालवली. मी ध्यान आणि पूजापाठ करायचे. २०१२ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला, तेव्हापर्यंत माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या होत्या. प्रेमात पडायचं किंवा लग्न करायचं, काहीच उरलं नव्हतं. तो तुरुंगातून बाहेर आला. जोपर्यंत तो तुरुंगातून बाहेर येत नाही तोपर्यंत मी भारतात परत जाणार नाही, असं मी ठरवलं होतं. त्यानंतर, तो केनियाला गेला आणि मी २०१२-२०१३ च्या सुमारास कुंभमेळ्यासाठी भारतात आले. मी १० दिवस राहिले. मी दुबईहून थेट अलाहाबादला (आता प्रयागराज) गेले आणि मग परत दुबईला गेले.”

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
Bibvewadi school girl murder, girl murder,
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष

हेही वाचा – Video: नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक

२०१७ मध्ये ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि ड्रग प्रकरणात आरोपी राहिलेल्या विक्की गोस्वामी यांच्याविरुद्ध अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या दोघांचे नाव आल्यावर त्या आधारे आरोपपत्र दाखल करण्यात आले. जानेवारीमध्ये गोस्वामी, इब्राहिम आणि बकताश आकाशा व गुलाम हुसैन यांना केनियातून अमेरिकेत नेण्यात आलं. या सर्वांना नोव्हेंबर २०१४ मध्ये यूएस ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीच्या (DEA) स्टिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आली होती.

हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट

२०१६ पासून विकीच्या संपर्कात नाही – ममता

“विक्की केनियाला परत गेला आणि एक-दोनदा मी त्याला भेटायला गेले आणि दुबईला परत आले. केनियामध्ये त्याच्यावर आधीच आरोप झाले होते. त्या काळात मी त्याच्याबरोबर होते. त्यानंतर २०१६ ते २०२४ या काळात मी स्वतःसाठी तपस्या केली,” असं ममता म्हणाली, “आता मी त्याच्या संपर्कात नाही, मी शेवटचे २०१६ मध्ये संपर्कात होते” असंही तिने सांगितलं.

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

ममता कुलकर्णी नुकतीच भारतात परत आली आहे. ती १२ वर्षांनी भारतात व २५ वर्षांनी मुंबईत आली आहे. ममता कुलकर्णीने १९९० च्या दशकात करण अर्जुन आणि बाजी सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २००० च्या काळात ती बॉलीवूडपासून दूर गेली आणि गेली २५ वर्षे ती दुबईत वास्तव्यास होती.

Story img Loader