उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील एका सिनेमागृहात नुकताच प्रदर्शित झालेला गदर २ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सिनेमागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृताचे नाव अक्षत तिवारी असे आहे. तो फोनवर बोलत पायऱ्या चढून वर आला आणि अचानक खाली कोसळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा

ही दुर्दैवी घटना शनिवारी संध्याकाळी ७.५० च्या सुमारास घडली. अष्टक ‘गदर २’ चित्रपट पाहण्यासाठी शहरातील फन सिनेमा हॉलमध्ये गेला होता. तो पायऱ्या चढून आत आला व अचानक खाली कोसळला. त्याला पाहताच आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी धावले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायपाल सिंह यांनी सांगितलं की, अक्षत तिवारीचा फोन अनलॉक होता, त्याच्या फोनवरून तिथे उपस्थित गार्ड आणि बाऊन्सर्सना त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधता आला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नायपाल सिंह म्हणाले की या घटनेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी तपास सुरू आहे. अक्षत सदर कोतवाली क्षेत्राच्या हद्दीतील द्वारकापुरी भागात राहायचा.

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

दरम्यान, ‘गदर २’ बद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाने देशभरात ४५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले आहेत, पण हा चित्रपट अजूनही सिनेमागृहांमध्ये चालतोय. त्याचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dies of heart attack in cinema hall who went to watch gadar 2 hrc