लोकप्रिय बॉलीवूड गायिका मोनाली ठाकुरबरोबर एका कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन झालं. या घटनेमुळे गायिकेने संताप व्यक्त केला आहे. ही घटना घडताच तिने कॉन्सर्ट थांबवला आणि गैरवर्तन करणाऱ्याला चांगलंच सुनावलं. कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीने गर्दीत उभे राहून मोनाली ठाकुरच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली, यामुळे ती भर कार्यक्रमात भडकली.

‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, मोनाली ठाकुर शनिवारी २९ जून रोजी भोपाळ येथील सेज विद्यापीठात परफॉर्म करण्यासाठी आली होती. या कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने कॉलेजची मुलं होती आणि प्रचंड गर्दी जमली होती. पण नंतर मोनालीने अचानक चालू कॉन्सर्ट थांबवला आणि तिच्या टीमला ती काहीतरी म्हणाली, त्यानंतर अचानक संतापली.

“मीच घर चालवते त्यामुळे…”, सई ताम्हणकरने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव; आईबद्दल म्हणाली….

कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

मोनाली ठाकुरने गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवत तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केल्याचं सांगितलं. तिने हा लैंगिक छळ असल्याचं म्हटलं. काही लोक गर्दीत लपून कमेंट करतात असंही ती म्हणाली. ‘तू खूप लहान आहेस आणि अशा गोष्टी कुणाला बोलू नयेत’ असं मोनाली त्या तरुणाला म्हणाली. या मुद्द्यावर बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं आणि आता भर कॉन्सर्टमध्ये हा प्रकार घडल्याने जाहीरपणे बोलली, असं मोनालीने सांगितलं.

सिनेमा फ्लॉप झाल्याने बुडाले पैसे, बॉलीवूड अभिनेता कोट्यवधींचं कर्ज फेडण्यासाठी सर्कसमध्ये…

कमेंट करणाऱ्याने काय म्हटलं?

प्रकरण शांत झाल्यावर मोनाली ठाकुरचा कॉन्सर्ट पुन्हा सुरू झाला. नंतर तिने राहिलेली गाणी गायली आणि उपस्थितांचे मनोरंजन केले. दरम्यान, मोनालीवर कमेंट करणाऱ्या तरुणाने घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण दिलं. आपण फक्त मोनालीच्या डान्सवर टिप्पणी केली होती आणि काहीही आक्षेपार्ह म्हटलं नव्हतं, असं तो म्हणाला.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मोनालीबरोबर घडलेल्या या प्रकारानंतर सोशल मीडियावर तिचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. मोनाली ठाकुर ही हिंदीतील लोकप्रिय गायिका आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या गायिकेने अनेक सुपरहिट गाणी गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘ये मोह मोह के धागे’, ‘सवांर लू’, ‘जरा जरा टच मी’ ही तिची काही गाजलेली गाणी आहेत. तिने अनेक सिंगिंग रिॲलिटी शोचे परीक्षण केले आहे. मोनाली जगभरात गायनाचे कार्यक्रम करते. तिचे कॉन्सर्ट खूप चर्चेत असतात.

Live Updates
Story img Loader