अभिनेत्री आणि लोकप्रिय होस्ट मंदिरा बेदीचा पती राज कौशलचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. आता पहिल्यांदाच मंदिराने पतीच्या निधनाबाबत भाष्य केलं आहे. तीन वर्षांपासून मंदिरा बोलणं टाळत होती, मात्र आता ती पतीच्या मृत्यूबद्दल सार्वजनिकपणे बोलू शकते, असं तिने सांगितलं. बराच काळ रडल्याशिवाय मी त्याच्याबद्दल बोलू शकत नव्हते, पण आता पुरेसं धैर्य एकवटलं आहे, असं मंदिराने नमूद केलं.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत मंदिरा म्हणाली की त्याच्या निधनानंतरचं पहिलं वर्ष हे सर्वात कठीण होतं, परंतु त्यानंतरच्या वर्षात गोष्टी थोड्या सुधारल्या. “मी आता आधीपेक्षा बऱ्या स्थितीत आहे. माझी मुलं आणि मी दररोज त्याच्याबद्दल बोलत असतो. आम्ही त्याला विसरलेलो नाही. पहिलं वर्ष खूपच जास्त कठीण होतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या परिस्थितीचा सामना करणंच अशक्य आहे. त्याच्याशिवायचा पहिला वाढदिवस, पहिली अॅनिव्हर्सरी, पहिली दिवाळी, पहिला ख्रिसमस, पहिलं नवीन वर्ष हे सगळं खूप अवघड होतं. दुसरं वर्ष थोडं सोपं आणि तिसरं वर्ष त्याहून थोडं सोपं आहे,” असं मंदिरा म्हणाली.

Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”

ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या

“असे काही क्षण असतात जेव्हा एखाद्या गाण्यामुळे त्याची आठवण येते. गरज पडल्यावर मी थेरपी घेतली आहे, अजूनही काही वेळा मी घेते. कारण माणूस म्हणून आपण नेहमीच त्या प्रक्रियेतून जात असतो. आता मी काय करू शकते, तर मी त्याच्याबद्दल बोलू शकते. मी भावुक होते, पण तरीही बोलू शकते. एक वेळ अशी होती की मी बोलू शकत नव्हते. आता मी न रडता बोलू शकते. तो गेल्यानंतर दोन महिन्यांनी मी पुन्हा कामाला सुरुवात केलीय मला माझ्या कुटुंबाला आणि स्वतःला आधार द्यायचा होता. मला माझ्या मुलांसाठी काम करावं लागणार होतं,” असं मंदिराने सांगितलं.

तीन लग्नं, दोन घटस्फोट अन् तिसरी पत्नी रशियन; फिल्मी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य

तीन वर्षांनंतरही अजून काही गोष्टी आहेत ज्या करणं अवघड असल्याचं मंदिरा सांगते. “माझ्याकडे सहा वर्षांपासून त्याची कार आहे. पण आता मला ती विकावी लागेल. मी भावनिक कारणांसाठी ती जवळ ठेवली होती, मात्र आता जेव्हा ती कार मी विकेन तेव्हा मी रडेन. त्यामुळे मी अजूनही त्यातून जातेय. मी बऱ्याच गोष्टींचा सामना आतापर्यंत केला आहे आणि आयुष्यभर तो नसण्याचं दुःख मला होत राहील. एक गोष्ट मी अजूनही करू शकत नाही ती म्हणजे मी किशोर कुमार यांची गाणी मी ऐकू शकत नाही,” असं भावुक होत मंदिरा म्हणाली.

लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर, काही दिवसांपूर्वीच घेतली मर्सिडीज, पूजेचे फोटो केले शेअर

मंदिराचा पती व दिग्दर्शक राज कौशल याचे वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने ३० जून २०२१ रोजी निधन झाले. त्याने अनेक जाहिरातींव्यतिरिक्त ‘प्यार में कभी कभी’ आणि ‘शादी का लड्डू’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते.