बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने ‘कबीर सिंग’ आणि ‘एम.एस. धोनी’सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कियाराने साध्या गर्ल नेक्स्ट डोअरच्या भूमिकाही केल्या अन् तिने बोल्ड भूमिकाही तितक्याच आत्मविश्वासाने साकारल्या. २०१८ साली नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’मधील चार छोट्या शॉर्टफिल्म्सची जबरदस्त चर्चा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यातील शेवटच्या म्हणजेच करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या शॉर्टफिल्ममध्ये कियारा अडवाणीने काम केलं होतं. खासकरून करण जोहरच्या या स्टोरीची अन् त्यातील एका खास सीनची चांगलीच चर्चा झाली. यामध्ये कियारा अडवाणीचं पात्र व्हायब्रेटरच्या सहाय्याने हस्तमैथुन करतानाचा एक सीन आहे, या सीनमधील कियाराच्या अभिनयाची लोकांनी खूप प्रशंसा केली तर काहींच्या भुवयादेखील उंचावल्या.

आणखी वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील क्षिति जोगचं करण जोहरने केलं कौतुक; म्हणाला, “तिची मेहनत…”

या सीनदरम्यान बॅकग्राऊंडला करण जोहरच्याच ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणं आपल्याला ऐकायला मिळतं. या सीनदरम्यान एवढं पवित्र गाणं लावल्याने त्यावेळी मंगेशकर कुटुंबीय चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी याबद्दल स्टेटमेंट देत करण जोहरचे चांगलेच कान खेचले होते.

मंगेशकर कुटुंबातील एका सदस्य बॉलिवूड हंगामाशी संवाद साधतांना म्हणाले होते, “संपूर्ण भारतातील एका आदरणीय अशा व्यक्तीच्या आवाजात रेकॉर्ड केलेले भजनासारखे पवित्र गाणे एका अभिनेत्रीच्या हस्तमैथुनाच्या सीनसाठी का वापरले गेले याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. खरंतर करण जोहर त्याऐवजी दुसरे कोणतेही गाणे वापरू शकला असता. अशा विचित्र सीनसाठी करणने लता दिदी यांच्या आवाजातील इतकं अजरामर गाणं का निवडलं?” पुढे ते म्हणाले, “करण जेव्हा कभी खुशी कभी गमसाठी जेव्हा हे गाणं लता मंगेशकर यांच्याकडून रेकॉर्ड करून  घेत होता तेव्हा तो म्हणाला होता की त्याचं सर्वात मोठं स्वप्नं होतं, आता मात्र त्याने या स्वप्नवत अशा गाण्याचं रूपांतर एका भयानक स्वप्नात केलं आहे.”

एकूणच त्यावेळी या सीनमुळे बराच वाद निर्माण झाला होता, शिवाय या चित्रपटातील सगळ्या शॉर्टफिल्म्सचंही कौतुक झालं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangeshkar family was upset for using lata mangeshkar song for kiara advani orgasm scene avn