शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. १० जुलैला ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर पाहून बॉलीवूडमधील कलाकार आणि किंग खानचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. करण जोहर, रणवीर सिंह, आलिया भट्ट, सलमान खान या कलाकारांनी किंग खानला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, या सगळ्यात एका प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा : “तिकीट काढून स्वत:चे चित्रपट पाहतोस का?” चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिले भन्नाट उत्तर; म्हणाला…
अभिनेता आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट मनीष पॉलने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये मनीष पॉलच्या डोक्यावर टक्कल पडलेले दिसत आहे. तसेच चेहऱ्यावर केलेल्या मेकअपमुळे त्याला ओळखताही येत नाही. मनीषच्या या हटके लुकवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “अरे तू हे काय केले आहेस?” असा प्रश्न अभिनेत्याला केला आहे. दुसऱ्या एका युजरने मनीषची तुलना पुनीतस्टारबरोबर केली आहे.
हेही वाचा : सुयश टिळकच्या पत्नीची लोकप्रिय हिंदी मालिकेत होणार एण्ट्री; आयुषी अनुभव शेअर करत म्हणाली…
मनीष पॉलने टक्कल पडलेला हा व्हिडीओ शेअर करत याला कॅप्शन देत, एकदम जवानमधील लूकप्रमाणे वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच अभिनेता पुढे लिहितो, “शाहरुख सर, तुम्हाला खूप प्रेम तुमच्या जवानसाठी मी प्रचंड उत्सुक आहे.”
‘जवान’च्या ट्रेलरमध्ये शेवटी शाहरुख “बेकरार करके हमे यूँ ना जाइये” या गाण्यावर टक्कल पडलेल्या लूकमध्ये नाचताना दिसत आहे. मनीषने सुद्धा आपल्या व्हिडीओला हेच गाणे जोडले आहे. दरम्यान, शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.