संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी- द डायमंड बझार’ या वेब सीरिजमुळे अभिनेत्री मनीषा कोईराला पुन्हा एकदा चर्चेत आली. अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्रीचं मलिकाजान हे पात्र खूप गाजलंय. इंडस्ट्रीसह प्रेक्षकदेखील तिच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसतायत.

अभिनेत्रीने तिच्या करिअरमधील अशा एका प्रसंगाचा उल्लेख केला, जिथे तिला एका प्रसिद्ध फोटोग्राफरकडून वाईट अनुभव आला होता. एका प्रसिद्ध फोटोग्राफरने त्याकाळी मनीषाला बिकिनी घालून फोटोशूट करण्यास आग्रह केला होता. मनीषाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

हेही वाचा… अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यातील लूकमुळे जस्टिन बीबरला केलं जातंय ट्रोल; नेटकरी म्हणाले, “१५० रुपयांची बनियन…”

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एका मुलाखतीत मनीषा म्हणाली, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला माझे फोटोग्राफ काढून आणायला सांगायचे. तर मी माझ्या आईसह एका प्रसिद्ध फोटोग्राफरकडे तेव्हा गेले होते आणि सुरुवातीला तो फोटोग्राफर मला म्हणाला की, तू भविष्यातली मोठी सुपरस्टार आहेस वगैरे… त्यानंतर तो मला म्हणाला की, तू फोटोशूटसाठी बिकिनी घाल. यावर मी त्याला म्हणाले की, सर जेव्हा मी बीचवर जाते किंवा पोहण्यासाठी स्विमिंगपूलमध्ये जाते तेव्हाच मी हे घालते; पण मला जर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी हा मार्ग निवडावा लागत असेल तर मी हे मुळीच घालणार नाही.”

मनीषाच्या विचारांबद्दल कळल्यानंतर त्याने तिला जायला सांगितलं. मनीषा त्याला म्हणाली की, “मी घातलेल्या संपूर्ण कपड्यांवर तुम्ही माझं फोटोशूट करा नाहीतर मी…” त्यानंतर एक मोठा डायलॉग म्हणत फोटोग्राफर मनीषाला म्हणाला, “जो मिट्टी पिघलने से शरमाती हो, उसको मूर्ती कैसे बनाये?” मी हे सगळं कधीच विसरले नाही.

हेही वाचा… गुडन्यूज दिल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध फॅशन डिझायनरने पहिल्यांदाच शेअर केले बेबी बंपचे फोटो; म्हणाली, “अजूनही थोडं…”

मुलाखतीत संवादादरम्यान मनीषाने हेदेखील सांगितलं की, ९०च्या काळात काही लोकांची मानसिकताच अशी होती. तिने हेदेखील सांगितलं की, “जेव्हा ती प्रसिद्ध अभिनेत्री बनली तेव्हा त्याच फोटोग्राफरला तिचं फोटोशूट करायचा योग आला आणि तेव्हा तो तिला म्हणाला की, मला माहीतच होतं की तू मोठी स्टार बनणार आहेस.”

दरम्यान, मनीषा कोईरालाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मनीषा शेवटची ‘हीरामंडी- द डायमंड बझार’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यन अभिनीत ‘शेहजादा’ या चित्रपटातदेखील अभिनेत्री झळकली होती.

Story img Loader