बॉलिवूडमधील कलाकारांचे अनेक किस्से व गाजलेली प्रेमप्रकरण आहेत. यातील एक म्हणजे नाना पाटेकर व मनीषा कोयराला यांचं अफेअर. नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या रिलेशनशिपबद्दल बरीच चर्चा रंगली होती. अग्निसाक्षी या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर व मनीषा कोयराला यांची पहिली भेट झाली होती.
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या अग्निसाक्षी चित्रपटात नाना पाटेकर व मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईराला २० वर्षांनी मोठ्या असलेल्या विवाहित नाना पाटेकर यांच्या प्रेमात पडली. त्यानंतर संजय लीला भन्सालीच्या खामोशी चित्रपटातही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात ते वडील-मुलगीच्या भूमिकेत होते. परंतु, सेटवर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
मनीषा कोईरालाला नाना पाटेकरांशी लग्न करायचं होतं. नाना पाटेकर तेव्हा पत्नीपासून वेगळे राहत होते. त्यामुळे माझ्याशी लग्न करुन संसार थाटावा, असं मनीषा कोईरालाला वाटत होतं. त्याचदरम्यान, नाना पाटेकरांचं नाव अभिनेत्री आएशा जुल्काबरोबरही जोडलं गेलं होतं. नाना पाटेकर व आएशाला रुममध्ये एकत्र पाहिल्यानंतर मनीषा त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या.
हेही वाचा>> ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, सिद्धार्थ आनंद म्हणाले “माझ्यासाठी आकडे…”
मनीषाय कोईरालाने २०१० साली सम्राट दहल यांच्याशी लग्न करुन संसार थाटला होता. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांच्या संसारात वादळ आल्याने २०१२ साली त्यांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.