अभिनेत्री मनीषा कोईराला सध्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजचं यश साजरं करत आहे. संजय लीला भन्साळी निर्मित आणि दिग्दर्शित नेटफ्लिक्स सीरिजमध्ये मनीषाने मलिकाजानची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुक झाला. आता फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत मनीषाने तिने नेहमीच चुकीच्या पुरुषांना डेट केल्याचा खुलासा केला.

काही जुन्या नातेसंबंधांबद्दल बोलताना मनीषा म्हणाली, “मी फक्त चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात का पडले याचा विचार मी केला. कारण मला आश्चर्य वाटायचं की मी हे वारंवार का करतेय? सर्वात त्रासदायक व्यक्तीकडे मी आकर्षित होतेय तर माझीच काहीतरी चूक आहे का? हे समजून घेत मला कशामुळे त्रास होत आहे यावर काम करणं आवश्यक असल्याचं मी ठरवलं. मी आता पाच ते सहा वर्षांपासून सिंगल आहे आणि मी रिलेशनशिपमध्ये येण्याच्या मूडमध्ये नाही कारण मला अजूनही असं वाटतं की मला स्वतःवर खूप काम करण्याची गरज आहे.”

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Justice Gawai over Laddu case
Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!
Anushka Sharma shares how her family adopted an early sleep routine; neurologist explains its importance for couples with kids
अनुष्का-विराट लवकर जेवण करतात अन् लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन अन् त्याचे फायदे

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

कसा जोडीदार हवा आहे असं विचारल्यावर मनीषा म्हणाली, “मला असं नातं आवडेल जिथे दोघेही एकमेकांना स्वीकारू आणि आयुष्यात आम्ही कुठे आहोत याबद्दल प्रामाणिक असू. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी शिकण्याची गरज आहे आणि आपण आपल्या प्रवासात एकमेकांना साथ देऊ शकतो का, हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. स्वप्नाळू, महत्वाकांक्षा असणाऱ्या जोडीदाराबरोबर मला राहायचं आहे, कारण मी खूप पॅशनेट आहे.”

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

“मी बाहेरची होते, मी नेपाळहून आले होते आणि इथे कोणालाच ओळखत नव्हते. मी नुकतीच शाळा सोडली होती आणि मला बरोबर की चूक याची जाणीव नव्हती. मला वाटलं की एकटेपणा प्रियकर किंवा जोडीदार भरून काढेल, पण तसं कधीच झालं नाही. त्यानंतर मला एकटे न राहण्याचा एक क्रिएटिव्ह मार्ग सापडला. काही लोक (ज्यांना मनीषाने डेट केलंय) नात्यांबद्दल रोमँटिकपणे बोलायचे, मला कँडललाइट डिनरवर घेऊन जाण्याबद्दल बोलायचे आणि मला आश्चर्य वाटायचं की हे कधी झालं. प्रत्येक वेळी ‘रेड फ्लॅग’ असायचा, पण मग मी दरवेळी माफ करून पुढे जायचे. वेळ आणि वाढत्या वयाबरोबर मला जाणवलं की मी माझ्या आजूबाजूला खूप अनावश्यक लोक जमवले आहेत,” असं मनीषा कोईरालाने नमूद केलं.