हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकू म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. मनोज बाजपेयी यांचे दर्जेदार चित्रपट पाहून त्यांचे मानधन आता पूर्वीपेक्षा वाढले असावे असा अंदाज त्यांचे काही चाहते बांधत आहेत. या सगळ्या प्रश्नांबाबत मनोज बाजपेयी यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
मनोज बायपेयी यांना ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. तरीही ते एखाद्या चित्रपटासाठी विचारणा झाल्यास तुलनेने कमी मानधन सांगतात याबाबत सांगताना मनोज बायपेयी म्हणाले, “एखाद्या चित्रपटासाठी मी सलमान-शाहरुख खान सारख्या बड्या स्टार्सप्रमाणे मानधन घेत नाही.”
‘द फॅमिली मॅन’साठी तुम्हाला शाहरुख खान किंवा सलमान खानइतके मानधन मिळाले का?, असा प्रश्न मनोज बाजपेयींना विचारण्यात आला. यावर मनोज म्हणाले, ओटीटी प्रोजेक्टचे निर्माते सुद्धा चित्रपटाच्या निर्मात्यांसारखेच असतात. ते एकवेळ बड्या स्टार्सना पैसे देतील. पण, साध्या कलाकारांना पैसा पुरवणार नाहीत. फॅमिली मॅनसाठी मला जेवढे मानधन अपेक्षित होते तेवढे मिळाले नाही.
हेही वाचा : प्रसिद्ध गायिका असीस कौरने गुपचूप उरकले लग्न; नवरा आहे बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार
ओटीटी प्लॅटफॉर्मवर हॉलीवूड स्टार्सला देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत बाजपेयी यांनी सांगितले की, “‘गोरा आएगा, शो करेगा तो पैसे दे देंगे।’ जसे की, तिकडे चीनमध्ये प्रत्येक ब्रॅंडची फॅक्टरी आहे आणि आपल्या इथे मजूर स्वस्तात काम करतात. तसा मी स्वस्तात काम करणारा मजूर आहे.”
हेही वाचा : “प्रेम, मैत्री आणि दु:ख…” बहुचर्चित ‘द आर्चीज’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ३ स्टारकिड्सचे बॉलीवूडमध्ये पदार्पण
दरम्यान, मनोज बायपेयींच्या‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सुरुवातीला ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. आता तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन सीझन-३’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.