Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयी हे तीन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी संघर्ष, नकार आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्क्रीनच्या ‘डियर मी’ या नवीन एपिसोडमध्ये मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल सांगितले आणि लोक त्यांना कसे उद्धट समजतात, याबद्दलही ते बोलले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज बाजपेयी यांना त्यांनी स्वतःला वादांपासून कसे दूर ठेवले हा प्रश्न विचारण्यात आला. यासह त्यांनी स्वतःला पार्टी आणि किंवा रेड कार्पेट कार्यक्रमांपासूनही कसे अलिप्त ठेवले हाही प्रश्न विचारण्यात आला. मनोज बाजपेयी म्हणाले, “माझं मोठं वादात अडकण्याचं असं काही विशेष कारण नाही, पण हे खरं आहे की मी कधीही पार्ट्यांना जात नाही. आता लोक मला आमंत्रणही देत नाहीत, कारण त्यांना समजलं आहे की मी उपस्थित राहत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं का उगाच अपमान करून घ्यावा? हा विचार करून ते मला आमंत्रण देत नाही. कृपया मला पार्ट्यांना बोलावू नका, कारण मला रात्री १०-१०.३० पर्यंत झोपायला जायचं असतं आणि आणि मला सकाळी लवकर उठायला आवडतं.”

हेही वाचा…नेटफ्लिक्सवरील ‘हे’ सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमे पाहिलेत का? गूढ कथा आणि रंजक वळणांसह आहेत भरपूर ट्विस्ट

त्यांनी पुढे सांगितलं, “हो, मी कधी कधी काही लोकांना भेटतो. माझे काही मित्र आहेत. शारीब हाशमी त्यापैकीच एक आहे. पण माझे फारसे अभिनेता मित्र नाहीत. मला के के मेनन यांचा खूप आदर आहे, तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा सुद्धा आदर करतो. पण आम्ही एकमेकांना फारसा वेळ देऊ शकत नाही, कारण आम्ही सगळेच खूप व्यस्त असतो.”

मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या स्वाभिमानाला उद्धटपणाचे लेबल लावले जाते, याबद्दल बोलताना सांगितले, “जे लोक मला ओळखत नाहीत, त्यांची माझ्याबद्दल काहीही धारणा असू शकते. काही लोकांना वाटतं की मी खूप उद्धट आहे, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही. मी खूप कमी लोकांशी बोलतो. यामुळे जर कोणाला वाटत असेल की मी उद्धट आहे, तर ते तसं मानू शकतात. पण ज्यादिवशी ते मला प्रत्यक्ष भेटून माझ्याशी बोलतील, त्यादिवशी त्यांचा हा गैरसमज नाहीसा होईल. मी एक कृतज्ञ व्यक्ती आहे. मी उद्धट नाही, पण माझ्यात स्वाभिमान नक्कीच आहे.”

हेही वाचा…झाकीर हुसैन यांची ‘ती’ शेवटची पोस्ट चर्चेत, शेअर केला होता ‘हा’ खास क्षण; चाहते कमेंट करत म्हणाले…

मनोज बाजपेयी अलीकडेच आलेल्या ‘डिस्पॅच’ या चित्रपटात दिसले होते.हा सिनेमा सध्या ‘झी ५’ वर स्ट्रीम होत आहे. मनोज बाजपेयी लवकरच ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee opens up why he do not go bollywood parties psg