मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या ‘डिस्पॅच’ या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी ‘१९७१’ चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक किस्सा शेअर केला. मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान त्यांना दोन-तीन वेळा मृत्यूला जवळून पाहण्याचा अनुभव आला होता. त्यांनी हेदेखील सांगितले की, अभिनेता मानव कौल यांच्या चुकीमुळे हा प्रसंग त्यांच्यावर ओढवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, ‘१९७१’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांची गाडी दरीत पडणार होती. त्यांना वाटले होते की, त्यांचे आयुष्य संपले आहे, ते आता मरणार आहेत; पण देवाची कृपा म्हणून ते वाचले.

हेही वाचा…“हे रिअल लाईफ प्रेम…”, गोविंद नामदेव यांनी ३९ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करण्याच्या चर्चांवर सोडलं मौन

मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, ते रवी किशन, मानव कौल, कुमुद मिश्रा व दीपक डोबरियाल हे सर्व जण एका जीपमध्ये बसले होते. सीन असा होता की, जीपने एका उतारावरून खाली यायचे होते आणि कॅमेऱ्यासमोर येऊन थांबायचे होते. कॅमेरामन उतारावरून येणाऱ्या जीपला शूट करीत होता. जीप जिथे थांबली. तिथून पुढे खूप खोल दरी होती.

मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “त्या वेळी मानव कौल ही खूपच मूर्ख व्यक्ती होती. तो खूप गंमत करायचा. मला सतत चिडवत असायचा. मी त्याला सांगितलं होतं की, तुला नीट ड्रायव्हिंग येत नाही. त्यामुळे सावकाश जीप चालव; पण मानव कौलनं माझं ऐकलं नाही. उलट तो जीप चालवताना मला घाबरवू लागला. नंतर असं घडलं की, जीप त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली. मानवला त्यावेळी व्यवस्थित ड्रायव्हिंग येत नव्हतं आणि जीप उतारावर होती.”

हेही वाचा…निवड चुकली, ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यावर बॉलीवूड दिग्दर्शकाचं स्पष्ट मत; म्हणाले…

पुढे हा प्रसंग सांगताना मनोज बाजपेयी म्हणाले, “उतारावरून खाली येणारी जीप वेगानं दरीकडे निघाली. आम्ही पाचही जणांनी समजून घेतले होते की, आता आम्ही वाचणार नाही. आमचे हातपाय पूर्ण सुन्न झाले होते. पण, अचानक जीप एका मोठ्या दगडावर अडकल्याने थांबली. अर्धी जीप दरीत लटकली होती, तर अर्धी दगडावर अडकलेली होती.”

हेही वाचा…करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”

मनोज बाजपेयी आणि इतर सर्व जण जीपमध्ये न हलता बसून राहिले. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने सर्वांना एकेक करून बाहेर काढले. मनोज बाजपेयी म्हणाले की, आजही जेव्हा ते मानव कौलला भेटतात, तेव्हा त्यांना ओरडतात. त्या घटनेची भीती अजूनही त्यांच्या मनात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee recounts near death experience during 1971 movie shoot psg