हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या एकही बंदा काफी है चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकू म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. आता मनोज बाजपेयींनी बॉलीवूड इंडस्ट्रीतील आतल्या आणि बाहेरच्या लोकांच्या मुद्द्यावर उघडपणे भाष्य केलं आहे. यावेळेस त्यांनी शाहरुख खानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- ‘तारासिंग’ आणि ‘सकिना’ २३ वर्षांनी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘गदर एक प्रेम कथा’चा नवा ट्रेलर प्रदर्शित

आज तकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मनोज बाजपेयी यांना विचारण्यात आले की, गेली ३ दशके इंडस्ट्रीत काम करत असूनही तुम्हाला इनसाइडर मानले जात नाही. या गोष्टीबद्दल कधी निराशा वाटते का? या प्रश्नाचे उत्तर देताना मनोज बाजपेयी यांनी शाहरुख खानचे उदाहरणही दिले. मनोज बाजपेयी म्हणाले “बघा, शाहरुख खानने इंडस्ट्री स्वीकारली आहे आणि हा त्याचा प्रवास होता. जेव्हा लोक मला बाहेरचा माणूस समजतात तेव्हा मी त्याचा सन्मान करतो. पाहिलं तर शाहरुख खानही बाहेरचा माणूस आहे. त्याने इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि ते त्याने अधिक चांगल्या पद्धतीने केले आहे. बॉलीवूडच्या खऱ्या आतील लोकांना त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. परंतु मला स्वतःसाठी हे कधीच नको होते.”

हेही वाचा- Video : “आधी शिष्टाचार शिका…”; ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’च्या आयोजकांवर कैलाश खेर संतापले, व्हिडीओ व्हायरल

मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, शाहरुख खान दिसायला चांगला आहे. तो नेहमी चांगला दिसत होता. त्याचा चॉकलेटी चेहरा ती खूप आकर्षक आहे. शाहरुख खान आणि मनोज बाजपेयी रंगभूमीच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. या दोघांनी ‘वीर जरा’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.