हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

मनोज यांनी नुकतंच ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बऱ्याच विषयांवर मोनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटसृष्टीतील त्यांचा अनुभव आणि एकूणच त्यांचं खासगी आयुष्य याबद्दल मनोज यांनी बरेच खुलासे केले. याबरोबरच त्यांनी चित्रपटसृष्टीतील राजकारण आणि त्यामुळे अभिनेता सुशांत सिंग राजपूतला बसलेला फटका याबद्दलही भाष्य केलं आहे.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

आणखी वाचा : ‘तुम बिन’ या प्रसिद्ध पाकिस्तानी मालिकेत दिसणार ‘वैवाहिक बलात्काराचा’ सीन; लेखिकेच्या ‘त्या’ वक्तव्यावर चाहते नाराज

याविषयी बोलताना मनोज म्हणाले, “चित्रपटसृष्टीत राजकारण आहेच, पण जसं तुम्ही यशस्वी होता ते राजकारण आणखी भयानक स्वरूप घ्यायला सुरुवात करतं. सुशांतला या गोष्टींचा खूप त्रास होत होता. तो याबद्दल माझ्याशी बऱ्याचदा चर्चा करायचा. त्याला आयुष्यात जे कामवायचं होतं त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याला सामना करायचा होता. त्यासाठी बरंच राजकारण सहन करावं लागतं. सुशांत ती गोष्ट सहन करू शकला नाही, त्यामुळेच त्याच्या बाबतीत हे सगळं घडलं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझी स्वप्नं तशी नव्हतीच, जिथे राजकारण आहे तिथे मी जाणं अजिबात पसंत करत नाही.”

आणखी वाचा : “आलियाच्या लग्नाच्या खर्चासाठी…” मुलीच्या साखरपुड्याबद्दल समजताच अनुराग कश्यपची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मनोज बाजपेयी यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट लवकरच ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना प्रथमच मनोज यांना एका वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ सीझन ३ ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader