हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

मनोज बाजपेयी यांचे मद्यपानाचे बरेच किस्से लोकांना माहीत आहेत. बऱ्याच मुलाखतीमध्ये मनोज यांनी त्यांचे हे किस्से सांगितलेही आहेत. असाच एक किस्सा त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितला. ‘Unfiltered by Samdish’ या यूट्यूब चॅनलच्या एका मुलाखतीमध्ये मनोज यांनी सांगितलं की बऱ्याच लोकांचा हा गैरसमज होता की मनोज हे वोडका शॉट घेऊन मग शॉट देत असत. वोडका पिणे हे जणू त्यांच्या अभिनयामागील रहस्य होतं, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असल्याचं त्यांनी सांगितलं.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; ‘All India Cine workers Aassociation’कडूनही चित्रपटावर बंदी घालायची मागणी

याबद्दल मनोज बाजपेयी म्हणाले,”एकदा आम्ही एका चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना एका ज्युनिअरने मला विचारलं की मी काय पीत आहे. त्यावर मी तिला औषध घेत आहे असं सांगितलं. त्यावर तिने मला एक गोष्ट सांगितली की त्या वेळी अभिनय करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये एक गैरसमज होता की मी कोणताही सीन करण्याआधी वोडका शॉट घेतो. मी त्या मुलीला म्हटलं, अरे मूर्ख लोकांनो, जी मी मेहनत घेत आहे ती तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही होमियोपथी औषधाला वोडका समजून बसलात. वोडका हे अभिनयामागील रहस्य कसं असू शकतं?”

मनोज बाजपेयी हे त्यांचे असे धमाल किस्से बऱ्याचदा सांगत असतात. मनोज यांचा “सिर्फ एक बंदा काफी है” हा आगामी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाट्यात सापडला होता, पण तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन सीझन-३’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader