हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. दर्जेदार अभिनयाने मनोजने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका मनोज यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज यांनी त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राइम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून त्यांनी ओटीटी विश्वात पदार्पण केलं. लोकांनी ही सीरिज अक्षरशः डोक्यावर घेतली. नुकतंच मनोज यांनी युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात हजेरी लावली आणि आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दलचे अनुभव लोकांबरोबर शेअर केले. बिहार ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई हा मनोज यांचा प्रवास खडतर होता. याच स्ट्रगलबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : बॉलिवूडचा खिलाडी कुमार का ठरतोय बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? अक्षयच्या चित्रपटांच्या अपयशामागे ‘हे’ कारण असू शकतं

याविषयी बोलताना मनोज म्हणाले, “तेव्हा मी दोन लोकांसह एका चाळीच्या खोलीत राहायचो. काही महिन्यांसाठी मी बाहेरगावी गेलो होतो, जेव्हा मी पुन्हा मुंबईत आलो तर तेव्हा त्या खोलीत १० लोक आले होते. या १० लोकांमध्ये दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया, विजय आचार्य ही मंडळी होती, तेव्हा हे सगळे मुंबईत चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी आले होते.”

मनोज बाजपेयी यांची ‘द फॅमिलीमॅन’ या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. याबरोबरच त्यांचा आगामी ‘गुलमोहर’ हा चित्रपट लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरसुद्धा आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.