सध्या सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक व्हायचे प्रमाण चांगलेच वाढले आहेत. बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मनोज वाजपेयी यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून चाहत्यांना माहिती दिली की त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. तसेच, त्याने आपल्या सर्व चाहत्यांना या अकाऊंटशी कोणत्याही प्रकारचा संवाद टाळण्याचे आवाहन केले आहे.
नुकतंच मनोज वाजपेयीने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, “माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. कृपया या समस्येचं निराकरण होईपर्यंत माझ्या प्रोफाइलवरून आज येणाऱ्या कोणत्याही पोस्टवर काहीही प्रतिक्रिया देऊ नाक. यावर काम सुरू आहे, ही समस्या सोडवल्यानंतर मी स्वतः तुम्हाला कळवेन.”
आणखी वाचा : अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘तेजाब’च्या रिमेकची घोषणा; ‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत
मनोजच्या ट्विटर प्रोफाइलवर आतापर्यंत कोणतीही चुकीची गोष्ट दिसलेली नाही. किंवा त्यांच्या अकाऊंटचा अजूनतरी कोणीही गैरवापर केलेला नाही. त्याच्या ट्विटरवर दिसणार्या पोस्ट फक्त गुरुवारच्या आहेत. गेले काही दिवस त्याच्या ट्विटर अकाऊंटवर चाहते त्याच्या जुन्या कामाची प्रशंसा करताना दिसत आहे.
![manoj bajpayee insta post](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/01/manoj-bajpayee-insta-post.jpeg?w=437)
गेल्या महिन्यात, मनोज वाजपेयीने अपूर्व सिंग कार्कीच्या एका कोर्टरूम ड्रामाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. याबरोबरच मनोज वाजपेयीने एक म्युझिक व्हिडिओही चित्रीत केला आहे. यामध्ये ‘सत्या’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘सपने में मिलती है’ या गाण्याचे रिमेक करण्यात आलं होतं. या गाण्यात मनोजसह ध्वनी भानुशाली आणि अभिमन्यू दासानी देखील झळकले. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं.