मनोज बाजपेयींच्या ‘जोरम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक देवाशिष माखिजा यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी चित्रपट, राजकारण, कला, त्यांचा प्रवास आणि संघर्ष याविषयी सांगितले. एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो हे त्याने या मुलाखतीमध्ये सांगितले. ‘आज्जी’ आणि ‘जोरम’सारखे अप्रतिम चित्रपट बनवल्यानंतरही पुढचा चित्रपट बनवणे कठीण असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जोरम’ला अप्रतिम रेटिंग मिळाले तसेच समीक्षकांनीही चित्रपटाला उचलून धरले पण त्यानंतरही देवाशिष यांचा संघर्ष सुरूच आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देवाशिष म्हणाले, “२० वर्षे या इंडस्ट्रीमध्ये काम करूनसुद्धा माझ्या एकाही चित्रपटातून आर्थिक फायदा मला झालेला नाही. माझी चाळीशी उलटून चालली आहे अन् माझी आजची आर्थिक परिस्थिती एक सायकल विकत घेण्याइतकीही नाहीये.”

आणखी वाचा : “मी थरथर कापत होते…”, समांथा रूथ प्रभूने सांगितला ‘उ अंटवा’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव

पुढे ते म्हणाले, “मी माझ्या कोणत्याच चित्रपटातून पैसे कमावले नाहीत. मला माझ्या घराचे भाडे भरणेदेखील जमत नाहीये. गेले पाच महीने मी भाडे दिलेले नाही. सध्या मी माझ्या घरमालकाकडे विनंती करतो आहे की त्याने मला घराबाहेर काढू नये. जेव्हा तुम्ही तुमच्या कलागुणांना अधिक प्राधान्य देता तेव्हा त्याची एक मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागते.” हा एक संघर्ष आणि यासाठी ते तयार आहेत असंही देवाशिष या मुलाखतीदरम्यान म्हणाले.

देवाशिष यांनी याआधीही या विषयावर भाष्य केलं आहे. त्याने २०१७ मध्ये रिलीज त्यांचा पहिला चित्रपट आला. त्यांच्या ‘आज्जी’ या चित्रपटाचे बजेट १ कोटी रुपये होते. पण हा चित्रपट चित्रपटगृहांमधून केवळ १५ लाखांची कमाई करू शकला. त्यांचा ‘जोरम’ हा नवा चित्रपट जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये लोकांच्या पसंतीस पडला, पण भारतात तो मर्यादित स्क्रीन्सवरच प्रदर्शित झाला. यामुळेच हा चित्रपटही फारशी कमाई करू शकला नसल्याने त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpyee starrer joram director is facing financial difficulties avn