प्रभास व क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट जुन महिन्यात प्रदर्शित झाला होता. या ऐतिहासिक चित्रपटातील संवाद व ग्राफिक्स प्रचंड वादात सापडले आणि निर्मात्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या चित्रपटाचा लेखक मनोज मुंतशिर याने आपण कथा लिहिण्यात चुकल्याचं मान्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज तकला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाला, “होय, लिखाणात माझी १०० टक्के चूक झाली आहे. मी इतका असुरक्षित माणूस नाही की मी चांगले लिहिलंय असं सांगून माझ्या लेखन कौशल्याचा बचाव करेन. माझी शंभर टक्के चूक आहे. पण त्या चुकीमागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. माझा कोणत्याही धर्माला दुखावण्याचा आणि सनातनला त्रास देण्याचा, प्रभू रामाची बदनामी करण्याचा किंवा हनुमानजींबद्दल वाईट बोलण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मी असं करण्याचा विचारही करणार नाही. होय, माझी एक चूक झाली आहे. ती मोठी आहे आणि त्यातून मी खूप काही शिकलो आहे. पण यापुढे मी खूप काळजी घेईन.”

अब्जाधीश उदय कोटक यांच्या मुलाने माजी मिस इंडियाशी बांधली लग्नगाठ, शाही विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला तेव्हा त्याचा वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला? असं विचारल्यावर मनोज म्हणाला, “मी माणूस आहे.. दगड नाही.. प्रेत नाही.. प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो. जेव्हा तुमच्यावर आरोप होतात, लोक वाईट बोलतात, तेव्हा माणूस दुखावतो. पण त्याला सामोरं जायला शिकलं पाहिजे. मला लोकांकडून अशी प्रतिक्रिया येईल असं कधीच वाटलं नव्हतं. हा चित्रपट अतिशय चांगल्या हेतूने बनवला गेला होता. जर या चित्रपटासाठी ६०० कोटी रुपये गुंतवले गेले असतील, तर तो सर्वोत्कृष्ट व्हावा, अशीच त्यामागची इच्छा असते. असा चित्रपट करून आपलं करिअर कोणाला संपवायचं आहे? यामागे आमचा कोणताही अजेंडा नव्हता. पण काही गोष्टी खराब होत गेल्या.”

मनोजने चित्रपटासंदर्भात वाद सुरू असताना स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली होती, ते करायला नको होतं, असं त्याला वाटतं. “मला असं वाटतं की जेव्हा गोष्टी इतक्या जोरात सुरू होत्या, तेव्हा मी स्पष्टीकरण द्यायला नको होतं. ही माझी सर्वात मोठी चूक होती. त्यावेळी मी बोलायला नको होते. यामुळे लोकांना राग असेल तरी त्यांचा राग रास्त आहे. कारण स्पष्टीकरण देण्याची ती वेळ नव्हती आणि आता मला माझी ती चूक समजली,” असं तो म्हणाला.

“इंटरनेटवर जे दिसतंय ते…”, रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओतील खऱ्या तरुणीची प्रतिक्रिया

तू नेहमीच तुझा धर्म आणि परंपरेला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. पण हा चित्रपट आला तेव्हा त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोपही तुझ्यावर झाला. त्यांच्याकडूनही मोठ्या नाराजीला तुला सामोरं जावं लागलं, त्यावर काय सांगशील, असं त्याला विचारण्यात आलं. “मला हिंदूंचा पाठिंबा मिळाला. तुम्ही फक्त सोशल मीडियावर पाहत असाल तर ते जग नाही. मला अनेकांनी पाठिंबा दिला. काही लोकांचा राग फक्त क्षणिक होता. आमचा कोणताही वाईट हेतू नव्हता हे त्यांनाही लक्षात आलं. खरं तर मला लोकांचा पाठिंबा नसता, तर मी आज इथे उभाही नसतो,” असं मनोज मुंतशिर म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj muntashir accepted mistake about adipurush says i went totally wrong hrc
Show comments